पुणे : शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोत संरक्षित करण्याबाबतच्या नव्या भूजल कायद्यावर आपल्या सूचना पाठवाव्यात आणि जलस्रोत संरक्षित करण्यासाठी हातभार लावावा, अशी मागणी जलदेवता सेवा अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी केली आहे. तसेच रविवारी नदीसंवर्धनासाठी उपोषण होणार आहे. या कायद्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजिली होती. यावेळी रवींद्र सिन्हा (भूजल अभियान), दीपक श्रोते (रामनदी स्वच्छता अभियान), ललित राठी (समग्र नदी परिवार) पुष्कर कुलकर्णी (वसुंधरा स्वच्छता अभियान) उपस्थित होते. या नव्या कायद्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. संस्था, नागरिक, तज्ज्ञांच्या सूचना मागवल्या आहेत. या सूचना उद्या म्हणजे ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत पाठवायच्या आहेत. पुण्यातून सुमारे २ हजारहून अधिक जणांनी सूचना केल्या आहेत. नागरिकांनी अधिकाधिक सूचना द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनी psec.wssd@ZÔhÔrÔshtrÔ.gov. यावर सूचना पाठवाव्यात. --------------------------सप्टेंबर महिन्याचा शेवटचा रविवार आंतरराष्ट्रीय नदी दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जलस्रोत वाचविण्यात यावे, असे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. गंगा की अविरलतासाठी १०० दिवसांपासून उपोषण करणाऱ्या स्वामी सानंदजींना आपला सहभाग नोंदवण्यासाठी एकदिवसीय मुळा, मुठा, राम नदीवर उपोषण करण्यात येणार आहे. तसेच बावधन येथील रामनदीजवळील विठ्ठल मंदिर व कॉपोर्रेशन शाळेजवळ रविवारी (दि. ३०) सकाळी ९ ते ५ एकदिवसीय उपोषण करणार आहोत, असे पटेल म्हणाले. नागरिकांच्या सह्या पंतप्रधानांना पाठविणार आपल्या पुढच्या पिढीसाठीची रामनदी प्रदूषणमुक्तव अविरल वाहत राहण्यासाठीचा सहभाग म्हणून सर्व नागरिकांच्या सह्या घेतलेला अर्ज पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवणार आहोत. तरी कृपया जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि सही करावी, असे आवाहन शैलेंद्र पटेल यांनी यावेळी केले.
जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 19:11 IST
शहरात व इतर ठिकाणीदेखील अनेक नैसर्गिक जलस्रोत आहेत. त्यातून २४ तास पाणी येते. हे सर्व संरक्षित केल्यास त्या परिसरातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते.
जलस्त्रोत वाचविण्यासाठी शहरातील नद्यांवर रविवारी एकदिवसीय उपोषण
ठळक मुद्देजागतिक नदीदिन; नव्या भूजल कायद्यावर हरकती नोंदवा सकाळी ९ ते ५ एकदिवसीय उपोषण करणारनागरिकांच्या सह्या घेतलेला अर्ज पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना पाठवणार