शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीस एक दिवसाची मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 19:15 IST

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील जागांवर सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत २९ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

पुणे: मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी-चिंचवड , नाशिक , अमरावती, नागपूर या शहरांमधील अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रवेश फेरी राबविली जात असून पहिल्या प्रवेश फेरीस एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील जागांवर सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत २९ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून पहिल्या फेरीतून प्रवेश घेण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.मात्र, शिक्षण विभागाने येत्या ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेशाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच विद्यार्थ्यांनी अलॉटमेंटनंतर प्रोसीड फॉर अ‍ॅडमिशन केल्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, दहावीचे गुणपत्रक तसेच आवश्यक असल्यास नॉन क्रोमिलिअर प्रमाणपत्र स्टुडेंट लॉगईनमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढणे शक्य झाले नाही. काही विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढण्यासाठी प्रसाव सादर केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी प्रस्तावाची पोच आणि वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केले असल्यास असे विद्यार्थी संबंधित प्रवगार्तून प्रवेशास पात्र राहतील. तसेच ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या संवगार्तून प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राबाबत कोणतीही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे जातप्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना तीस दिवसात जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे,अन्यथा संबंधित विद्याथ्यार्चा प्रवेश रद्द होईल,याची नोंद घ्यावी,असे राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय