अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ
By Admin | Updated: June 18, 2015 23:44 IST2015-06-18T23:44:25+5:302015-06-18T23:44:25+5:30
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज

अकरावी प्रवेशासाठी एक दिवस मुदतवाढ
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज भरण्यासाठी अकरावी प्रवेश समितीने एक दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे अद्याप प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून सबमिट करता येणार आहे,असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिध्द केलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार १८ जून ही आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतीम तारिख होती. मात्र,उपनगर परिसरातील काही विद्यार्थ्यांना वीज पुरवठा खंडीत असल्यामुळे आॅनलाईन अर्ज भरता आलेला नाही. त्याच प्रमाणे काही शाळांमध्ये तसेच मार्गदर्शन केंद्रांमध्ये अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर राहण्याची शक्यता असल्याचे प्रवेश समितीला जाणवले. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली.
जाधव म्हणाले, एकही विद्यार्थी आॅनलाइन प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी १९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत विद्यार्थी अकरावी प्रवेशाची माहिती पुस्तिका विकत घेवू शकतील. दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरावा. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत आॅनलाइन अर्जाच्या दुसऱ्या भागात कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून अर्ज सबमिट करावा.
कमीत कमी ४० आणि जास्तीत
जास्त ५० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवेशच्या माहिती पुस्तिकांची विक्री गरवारे कॉलेज सह केवळ विभागीय केंद्रावर केली
जाणार आहे. (प्रतिनिधी)
- आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी गुरूवारी ५ वाजेपर्यंत ७५ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी लॉग इन केले.त्यातील ७० हजार ३६४ विद्यार्थ्यांनी अर्ज अॅप्रुव्ह केले आहेत.तर ६४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरून अर्ज फायनल केला आहे.त्यामुळे सुमारे ९
हजार विद्यार्थ्यांचा अर्ज
फायन करायचा राहिल्याचे दिसून येते. हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याचा विचार समितीने केला मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे, असेही रामचंद्र जाधव म्हणाले.