नीरा येथे एकाची रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST2021-08-12T04:15:01+5:302021-08-12T04:15:01+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामतीच्या वाणेवाडी नजीकच्या मळशी येथील हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय ४०) यांनी रात्री १ ...

One commits suicide under a train at Nira | नीरा येथे एकाची रेल्वेखाली आत्महत्या

नीरा येथे एकाची रेल्वेखाली आत्महत्या

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बारामतीच्या वाणेवाडी नजीकच्या मळशी येथील हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय ४०) यांनी रात्री १ वाजता मशरूम कंपनीत कामाला जातो, असे सांगत घराबाहेर पडले. दुचाकीवरून ते पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरून पिंपरे (खुर्द) येथील नीरा डावा कालवा येथील पुणे - कोल्हापूर रेल्वे मार्गाजवळ आले. तेथे दुचाकी लावली व रेल्वे रुळावरून चालत पुण्याच्या दिशेने निघाले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली त्यांनी जीव दिला. याबाबत हंबीरराव यांचे भाऊ लक्ष्मण रावसाहेब जगताप यांनी नीरा पोलिसांत फिर्याद दिली. नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, संदीप मोकाशी, हरिश्चंद्र करे, नीलेश जाधव, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांनी घटनास्थळी जाऊन जगताप यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली. या घटनेचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक हरिश्चंद्र करे करीत आहेत.

Web Title: One commits suicide under a train at Nira