घोडनदीपात्रात उडी मारून एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:07+5:302021-03-28T04:12:07+5:30

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील बैलांचे व्यापारी पोपट तुकाराम खिरड हे आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मंगळवारी ...

One commits suicide by jumping into a horse-drawn carriage | घोडनदीपात्रात उडी मारून एकाची आत्महत्या

घोडनदीपात्रात उडी मारून एकाची आत्महत्या

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथील बैलांचे व्यापारी पोपट तुकाराम खिरड हे आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी कोणाला काही न सांगता ते घराबाहेर पडले. वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत असलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधारा येथील काठावर त्यांची कपडे, दुचाकी व चष्मा मिळून आला होता. त्यामुळे खिरड यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज बांधला जात होता. तरुणांनी मागील तीन दिवसांपासून नदीपात्रात त्यांचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळाला आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी अक्षय खिरड यांनी मंचर पोलिसात माहिती दिली आहे.

--

फोटो क्रमांक: २७मंचर पोपट खिरड फोटो

Web Title: One commits suicide by jumping into a horse-drawn carriage