पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकास कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:56+5:302020-11-28T04:05:56+5:30
पुणे : बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अविनाश पुंडलिक तांदळेकर (वय २६, रा. राजप्लाझा सोसायटी, धनकवडी) यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस ...

पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एकास कोठडी
पुणे : बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अविनाश पुंडलिक तांदळेकर (वय २६, रा. राजप्लाझा सोसायटी, धनकवडी) यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ३१ हजार रुपयांचा माल जप्त केला. याबाबत पोलिस नाईक निलेश गोविंद शिवतरे यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तांदळेकर हा बिबवेवाडी परिसरातील धन्वंतरी चिकित्सालय येथे फिरत होता. यावेळी, पोलिसांना संशय आल्याने त्याची झडती घेतली असता त्याकडे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले. पिस्तुल जवळ बाळगण्याचा त्याचा उद्देश काय होता, त्याने ते पिस्तुल कोठून मिळवले तसेच त्याने त्याचा वापर केला आहे का, याबाबतचा तपास करायचा असल्याने सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.