एकाचा निर्घृण खून

By Admin | Updated: March 9, 2017 04:10 IST2017-03-09T04:10:06+5:302017-03-09T04:10:06+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा लोखंडी टॉमी व दगडाच्या साहाय्याने निर्घृणपणे खून करण्यात

One of the bloodless murders | एकाचा निर्घृण खून

एकाचा निर्घृण खून

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा लोखंडी टॉमी व दगडाच्या साहाय्याने निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी दयानंद बाबासाहेब लिमकर (उस्मनाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना मंगळवार (७ मार्च) रोजी हीरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमएच ४२ डब्ल्यू ३९४६) पडलेली दिसली. अपघात झाल्याचा संशय आल्याने ते थांबले. त्याचवेळी त्यांना फाटकाचे आत फाटकाकडे तोंड करून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच १४ बीए ९७९) उभी असलेली दिसली. लिमकर यांनी आपली दुचाकी त्या दिशेने वळवली तेव्हा त्यांना आपल्या दुचाकीच्या उजेडामुळे ३० ते ३५ वर्षे वयाचा एक इसम डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसला. त्याचे अंगात पांढरा शर्ट व निळी जिन पॅन्ट घातलेली होती.
तेथे अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचे तीन इसम उभे होते. काही वेळाने लोखंडी रॉड हातात असलेला इसम फाटकातून पळत दुचाकीकडे आला त्याने चालू असलेला इंडिकेटर बंद केला व दुचाकी ओढत महामार्गाच्या खाली आणून टाकली. तो लिमकर यांच्यादिशेने धावत येऊ
लागला. यामुळे ते घाबरले व तेथून निघून येऊन गुऱ्हाळात येऊन झोपले. तत्पूर्वी त्यांनी सदर बाब पोलिसांना कळवावी म्हणून १०० नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेक वेळा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.
सकाळी त्यांनी पोलिसांना रात्री घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: One of the bloodless murders