गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:09 IST2020-12-07T04:09:00+5:302020-12-07T04:09:00+5:30
नंदकुमार बाळासाहेब साळुंके (रा. बीएसएनल कार्यालय समोर नारायणगाव, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार ...

गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एकास अटक
नंदकुमार बाळासाहेब साळुंके (रा. बीएसएनल कार्यालय समोर नारायणगाव, ता. जुन्नर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार दिनेश दत्तात्रय साबळे यांनी फिर्याद दिली आहे. नारायणगावमध्ये एका चौकामध्ये एक जण गावठी बनावटीची रिव्हॉल्वर घेऊन शुक्रवारी रात्री ९ वाजता येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक तयार करून सापळा रचला. यावेळी नंदकुमार साळुंके हा चौकामध्ये आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला पकडले. साळुंके याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २० हजार रूपयांचे गावठी रिव्हॉल्वर मिळून आले . पोलिसांनी साळुंके वर गुन्हा दाखल केला आहे.
- गावठी कट्टा बाळगणाऱ्या नारायणगाव येथील युवकाला गावडी कट्टा सह पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीसह पोलीस अधिकारी दत्तात्रय गुंड व पोलीस पथक