एकाला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक
By Admin | Updated: February 23, 2017 02:27 IST2017-02-23T02:27:22+5:302017-02-23T02:27:22+5:30
शारदानगर (ता. बारामती) येथील २४ फाटा परिसरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला

एकाला शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक
बारामती : शारदानगर (ता. बारामती) येथील २४ फाटा परिसरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी एका तरुणाला गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. झडतीदरम्यान या तरुणाकडे चाकू, तलवार आदी हत्यारे मिळून आली. राहूल ऊर्फ हिमेश रोहिदास जाधव (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा पुणे) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली.
निवडणूक निकालाच्या अनुषंगाने गुन्हेशोध पथक बारामती-नीरा रस्त्यावर गस्त घालत होते. यादरम्यान शारदानगर परिसरातील २४ फाटा नजीक जाधव हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याची झडती घेण्यात आली. या वेळी त्याच्याकडे चाकू व तलवार अढळून आली. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली.