कँटोन्मेंट निवडणुकीसाठी 25 जणांचे 1क्क् अर्ज

By Admin | Updated: December 11, 2014 00:37 IST2014-12-11T00:37:00+5:302014-12-11T00:37:00+5:30

25 इच्छुकांचे 1क्क् उमेदवारी अर्ज आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिका:यांकडे दाखल झाले. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अधिकृत ए.बी.फॉर्म आज सादर केला नाही.

For one, 25 applications for provision of Cantonment | कँटोन्मेंट निवडणुकीसाठी 25 जणांचे 1क्क् अर्ज

कँटोन्मेंट निवडणुकीसाठी 25 जणांचे 1क्क् अर्ज

पुणो  : 25 इच्छुकांचे 1क्क् उमेदवारी अर्ज आज अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिका:यांकडे दाखल झाले. कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने अधिकृत ए.बी.फॉर्म आज सादर केला नाही. 
 वॉर्ड क्रमांक-1 मधून एकच अर्ज दाखल झाला. वॉर्ड क्रमांक-2 मधून 4 जणांनी 16, तर क्रमांक-3 मधून 2 जणांनी 8 अर्ज दाखल केले. वॉर्ड क्रमांक-4 मधून 4 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले. वॉर्ड क्रमांक-5, 6 आणि 7 मधून प्रत्येकी 3 जणांनी प्रत्येकी 12 अर्ज दाखल केले. वॉर्ड क्रमांक 8 मधून 5 जणांनी 2क् अर्ज भरले. ज्या अर्जदारांनी सोबत योग्य कागदपत्रंची पूर्तता केलेली नाही, त्यांच्यासाठी उद्या सायंकाळी 5 र्पयत मुदत देण्यात आली आहे.
 उद्या सकाळी 1क् ते 1 आणि सायंकाळी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज देण्याची अखेरची मुदत असून, सायंकाळी 6 नंतर छाननी होणार आहे.
 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठही उमेदवारांना ‘बी’ फॉर्म देण्यात आले आहेत, उद्या ‘ए’ फॉर्म दिले जातील. त्यामुळे आमच्या पक्षाने बाजी मारली आहे, असा दावा या पक्षाचे कँटोन्मेंट निवडणुकीचे प्रभारी सुनील बनकर यांनी केला. मात्र, ‘ए’ फॉर्ममध्ये ज्याला पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करण्याची अधिकृत मान्यता दिली आहे, त्याच्या नावाचे अधिकारपत्र असते. ‘बी’फॉर्ममध्ये ज्याला उमेदवारी देण्यात आली आहे त्याचे नाव असते, असे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: For one, 25 applications for provision of Cantonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.