शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुठा नदीपात्र पुन्हा जलपर्णीने व्यापले : प्रशासनाकडून शोध सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:29 IST

महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या 26 कोटींच्या निविदेवरून पालिकेमध्ये राडा झाला होता...

ठळक मुद्दे पालिकेत घडलेल्या राड्यानंतर पुन्हा विषय ऐरणीवर शहरातील तलावातील जलपर्णी काढण्याच्या हालचाली मंदावल्या. 

पुणे : शहराच्या मध्यवस्तीमधून वाहणाऱ्या मुठा नदीपात्रामध्ये बुधवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर जलपर्णी यायला सुरुवात झाली. ही जलपर्णी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी आली याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वारजे ते खडकवासला धरणादरम्यान साठलेली जलपर्णी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महापालिका प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या 26 कोटींच्या निविदेवरून पालिकेमध्ये राडा झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर, अरविंद शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. या प्रकरणावरून निंबाळकर यांनी नागरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. जलपर्णी काढण्याच्या निविदेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करीत विरोधकांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. जलपर्णीवरून एवढा मोठा गदारोळ झालेला असताना नदीपात्र आणि शहरातील तलावातील जलपर्णी काढण्याच्या हालचाली मंदावल्या. बुधवारी दुपारनंतर मुठा नदीपात्रामध्ये मोठ्या जलपर्णी वाहात आली. सांडपाण्यासोबत आलेल्या जलपणीर्मुळे संपूर्ण नदीपात्र भरून गेले होते.रासायनिक द्रव्ये, विनाप्रक्रिया नदीत सोडण्यात येणारे मैलापाणी, नाल्यांमधील प्रदूषित पाणणी यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. दिवसेंदिवस जलपर्णीचा त्रास वाढत चालला आहे. दर वर्षी शहरातील नद्या आणि तलावांमधील जलपर्णी काढण्याच्या खचार्चे आकडे फुगत चालले आहेत.यासोबतच जलपणीर्चे जलजीवसृष्टीवर होणारे दुष्परिणाम वेगळेच. मुठा, मुळा, पवना या नद्यासह पाषण, कात्रजच्या दोन तलावामध्ये दर वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण होते. नदीकाठ आणि तलाव परिसरातील नागरिकांना डास आणि कीटकांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे एकंदर चित्र आहे

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmula muthaमुळा मुठा