शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 12:52 IST

आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश

नीरा : आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या  प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज होता. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.  

सातारा जिल्हयातील पाडेगाव येथील कालचा मुक्काम होता. सोमवारी सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा नीरा नदी किनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळा प्रमुखांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, चोपदार बाळासाहेब रणदिवे चोपदार, दिनकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी 'माऊली माऊलींच्या' जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माऊलींच्या पादुकांना ठिक सव्वानऊ वाजता स्नान घातले. 

माऊलींचे स्नान सुरु असताना सोहळ्या सोबत आलेले पुरुष विणेकरी व तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथा पुढील व नंतर रथा मागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभुतपुर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा 'माऊली माऊलीच्या' जयघोषात मोठय़ा उत्साहात व शांतते पारपडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने सकाळी दहा वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत विठ्ठल मंदिरात विसाव्यासाठी ठेवण्यात आली.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूर