शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

२२ डिसेंबरला शनिवारवाड्यावर ऐकू येईल ‘ती’चा आवाज; ‘सातच्या आत घरात’ हेच आता बास!

By संजय आवटे | Updated: December 17, 2023 15:02 IST

शनिवारवाड्यावर पेटेल मशाल. स्वतःसाठी, तुझी शक्ती दाखवण्यासाठी तुला सहभागी व्हायचं आहे या सेलिब्रेशनमध्ये. येणार ना?

संजय आवटे  संपादक

- ‘ती’ एकटी बाहेर पडते आणि अंधारून येतं, तेव्हा तिच्याकडं बघणाऱ्या ज्या वाईट नजरा असतात, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तिलाच घरात बसायला सांगणं हा कोणता न्याय? पुणे शहर आधुनिक असेल, तर तिथं महिला- मुलींना कोणत्याही वेळी सुरक्षित वाटलं पाहिजे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला हवेत, हे खरंच आहे; पण मुलींना हे शहर सुरक्षित वाटेल, अशी व्यवस्था आधी तयार केली पाहिजे. त्यासाठी मुळात मुलांशी बोललं पाहिजे. महिलांचा सन्मान करायला त्यांना लहानपणापासूनच शिकवलं पाहिजे. एखादी मुलगी ‘नाही’ म्हणते, तेव्हा त्या नकाराचा सन्मान करायला शिकवलं पाहिजे.

“Oh Woman! Anatomy is thy destiny’ अर्थात, “हे स्त्री, शरीर हीच तुझी नियती आहे”, असं पूर्वी म्हटलं जात असे. आज काळ बदलला. ती घराबाहेर पडली. चमकदार कामगिरी करू लागली. तरी शरीरात तिला बंदिस्त करण्याचा डाव आहेच. हा डाव आपल्याला उधळून लावायचा आहे. आजही ती असुरक्षित. सगळीकडं. रस्त्यावर आणि घरातही. बाहेर आणि अगदी गर्भातही.

एरव्ही गप्पा खूप मारतो आपण. स्त्री म्हणजे देवी. तिला देवी कशाला मानता? माणूसपणाचे हक्क द्या तिला. तिला विशेष अधिकार नको आहेत. बरोबरीचे अधिकार हवे आहेत. तिला ‘माणूस’ मानलं जायला हवंय. आजही ज्या देशात हुंडा दिला आणि घेतला जातो, आजही जिथं हुंड्यासाठी तिचा खून होतो, एकतर्फी आकर्षणातून तिला जिवंत जाळलं जातं, कोयता उगारला जातो, कधी ॲसिड फेकून तिला संपवलं जातं, अशा समाजाला प्रगत कसं म्हणायचं? आणि, हे असे नराधम आहेत, म्हणून तिलाच तुरुंगात ढकलायचं? तिच्यावरच बंधनं लादायची? हे बरोबर नाही. तिनं कधी घरी यावं, कधी बाहेर जावं, हे ठरवणारे तुम्ही कोण? तिच्यावर अधिकार सांगणारे तुम्ही कोण? हे बदलायला हवं.

सखे,म्हणून, लढायचं आहे या अंधाराच्या विरुद्ध. २२ डिसेंबर ही वर्षातील सगळ्यात मोठी रात्र. त्यादिवशी शनिवारवाड्यावर पेटेल मशाल. स्वतःसाठी, तुझी शक्ती दाखवण्यासाठी तुला सहभागी व्हायचं आहे या सेलिब्रेशनमध्ये. येणार ना?

आम्ही सुरक्षित आहोतच; तुम्ही तुमच्या नजर बदला! 

सखे,तुला तुझी ताकद दाखवावीच लागणार आहे. ज्या अंधाराची भीती दाखवतात ना हे, त्याच अंधारावर तुला मात करायची आहे. २२ डिसेंबर ही वर्षातील सगळ्यात मोठी रात्र. या रात्री तू रस्त्यावर उतरायचं. मस्त. तुला हवं तसं. तुझ्या आवडत्या कपड्यात. तुला आवडणाऱ्या दिमाखात. अशा हजारो सख्या रात्री चालतील. कोणासाठी? स्वतःसाठी. एरव्ही जगासाठी एवढं करतेस. कधी घरच्यांसाठी, कधी नातेवाइकांसाठी. आज बाहेर पड आपली ताकद दाखवण्यासाठी. या रस्त्यावर छान सेलिब्रेशन करू. रस्त्यावर नाटक, गाणी, गप्पा, शेरोशायरी, अशी धमाल असेल आणि, तुला जे आवडतं, त्या खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. सख्याच मशाल पेटवतील शनिवारवाड्यावर. हा असा पहिला ऐतिहासिक सोहळा ठरेल. महिला सुरक्षेची चिंता करू नका. आम्ही सुरक्षित आहोतच. तुम्ही तुमच्या नजरा बदला, हा संदेश द्यायचाय आपल्याला आणि हो, हा ‘नाइट वॉक’ फक्त महिलांचा असेल. सोबत चिमुकली मुलं असायला मात्र हरकत नाही. २२ डिसेंबरला रात्री १० वाजता अलका टॉकीज चौकात जमायचं.

टॅग्स :PuneपुणेShaniwar WadaशनिवारवाडाWomenमहिलाSocialसामाजिकcultureसांस्कृतिक