ओम सूर्याय नम:!
By Admin | Updated: February 7, 2017 03:05 IST2017-02-07T03:05:08+5:302017-02-07T03:05:08+5:30
सूर्यदेवाला केलेले वंदन... ओम मित्राय नम:, ओम रवये नम:, ओम सूर्याय नम: अशा मंत्रोच्चारात सुमारे ७०० विद्यार्थिनींनी १० हजार सांघिक सूर्यनमस्कार घालून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला.

ओम सूर्याय नम:!
पुणे : सूर्यदेवाला केलेले वंदन... ओम मित्राय नम:, ओम रवये नम:, ओम सूर्याय नम: अशा मंत्रोच्चारात सुमारे ७०० विद्यार्थिनींनी १० हजार सांघिक सूर्यनमस्कार घालून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला.
निमित्त होते, क्रीडाभारती पुणे महानगर कसबा विभागातर्फे रमणबाग प्रशालेच्या मैदानावर रथसप्तमीनिमित्त आयोजित सांघिक सूर्यनमस्कार या कार्यक्रमाचे. महापालिकेच्या सहायक आयुक्त (क्रीडा) किशोरी शिंदे, डॉ. मिलिंद मोडक, क्रीडाभारती महानगर अध्यक्ष शैलेश आपटे, अखिल भारतीय क्रीडामंत्री राज चौधरी, राज्याचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश बोरकर, सहमंत्री प्रदीप अष्टपुत्रे, सुभाष कुलकर्णी उपस्थित होते.
डॉ. मिलिंद मोडक म्हणाले, ‘‘प्रत्येकाची दिवसाची सुरुवात पहाटे सूर्यनमस्काराने झाली पाहिजे. सूर्यनमस्कार हा सर्व व्यायामांचा राजा आहे. मैदानी व पारंपरिक खेळ कमी झाल्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल देखील होत नाही. वाढत्या धावपळीच्या जीवनात आरोग्य
चांगले ठेवण्यासाठी योग्य आहारासोबत योग्य व्यायामाचीदेखील गरज आहे.’’ (प्रतिनिधी)