शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

'ॐ नमस्ते गणपतये...' दगडूशेठ गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 12:39 IST

कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला.  

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या  पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. 

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया, असेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. 

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. ट्रस्टच्या  जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले.  तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडताना दहीहंडीला काही वेळ शौर्याने लटकत एकटयाने दहीहंडी फोडणा- या प्रथमेश कारळे या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळाच्या गोविंदास ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह, महावस्त्र व २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवSocialसामाजिक