शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:39 IST

अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला...

बारामती: शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून कऱ्हावागज (ता.बारामती) येथील ५० वर्षीय महिलेचा कुऱ्हाडीने खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि ९) दुपारी घडली. गंगूबाई तात्याराम मोरे असे या महिलेचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गंगूबाई यांच्या सून प्रमिला प्रमोद मोरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या अडीच वर्षांपूर्वी फियार्दीच्या शेजारी राहणारे भावकीतील किरण दादा मोरे यांची फियार्दीच्या सासू-सासऱ्यांबरोबर शेळ्या अंगणात जाण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. त्यावेळी भावकीतील लोकांनी दोन्ही बाजूंची समजूत काढत भांडण मिटवले होते. त्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.

तेव्हापासून ही दोन्ही कुटुंबे एकमेकांशी बोलत नव्हती. रविवारी(दि. ९) दुपारी दीड वाजता फिर्यार्दीने पती प्रमोद, सासू गंगूबाई यांच्यासमवेत  जेवण केले. अर्ध्या तासाने पती प्रमोद हे बारामतीला कामावर निघून गेले. सासू गंगूबाई या नातू सार्थक व जीवन यांना सोबत घेत गप्पा मारण्यासाठी घराजवळील कांतीलाल मोरे यांच्या पत्राशेडजवळ गेल्या होत्या. अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला. त्याने तेथे जात गंगूबाई यांच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीने वार केला.

या घटनेत गंगूबाई या जमिनीवर कोसळल्या. हा प्रकार पाहताच फिर्यादीने आरडाओरडा करीत धावत जात आरोपीच्या हातातील कुऱ्हाड हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना बाजूला ढकलून देत गंगूबाई यांच्या छातीवर पुन्हा कुऱ्हाडीने वार केला. तुझ्या सासूचा कसा काटा काढला, तु पुढे ये, तुझा पण काटा काढतो असे धमकावत तो हातातील कुहाड घेत तो फियादीच्या अंगावरही धावून गेला.

त्यानंतर आरोपी पायातील चप्पल जागीच सोडून माळरानाच्या दिशेने पळून गेला. फिर्यादीने पतीला फोनवरून याची कल्पना दिली. गुन्हा घडल्यानंर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादीच्या कुटुंबाने यावेळी किरण याला पकडण्याची मागणी केले. जोपर्यंत आरोपीला पकडले जात नाही तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नसल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस प्रशासनाने समजूत काढल्यानंतर मृतदेह बारामतीत सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला. पोलिसांनी देखील तपास करीत  किरण मोरे याला अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक महेश विधाते यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती