जुन्या भांडणातून शेजारच्यानेच घातला कुऱ्हाडीचा घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:09 IST2021-05-01T04:09:17+5:302021-05-01T04:09:17+5:30
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून शेजारच्यानेच तरुणावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही ...

जुन्या भांडणातून शेजारच्यानेच घातला कुऱ्हाडीचा घाव
पुणे : जुन्या भांडणाच्या रागातून शेजारच्यानेच तरुणावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. २९) कुंजीरवाडी-माळवाडीमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
सुखराज ऊर्फ सुका मुकिदा भंडलकर (वय ३०, रा. कुंजीरवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बाळू दशरथ वळखिंडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या पत्नी गीता वळखिंडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडलकर आणि वळखिंडे शेजारी राहायला आहेत. त्यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याचा राग आल्यामुळे सुखराजने बाळूला तुला आज जिवंत सोडणार नाही, आज तू जिवंत कसा राहतो तेच बघतो, असे म्हणत कुऱ्हाडीने वार करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी तपास करीत आहेत.