शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यम्! पुण्यात एका करकोचाने चक्क मोबाईल 'टॉवर'वरच बांधले घरटे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 13:33 IST

मोबाईल टाँवरमधील लहरींमुळे शहरातले चिमण्या, साळुंक्या सारखे पक्षी दूर गेलेत हा समज या करकोच्यांनी खोटा ठरवला आहे...

पुणे : मोबाईल टॉवरमुळे चिमण्या, साळुंक्या कमी झाल्याची ओरड होताना दिसून येते. पण एका करकोचाने (स्टाँर्क )  या टॉवरवरच आपलं घरटं बांधलं आहे. पुण्यालगतच्या छोट्या गावात हे घरटं पक्षी अभ्यासक डाँ. श्रीकांत इंगळहळीकर यांना ते दिसले आहे. साधारण जुलै-आँगस्ट पासून करकोचा घरटं बांधायला सुरवात करत असतो. आता त्यात दोन पिल्लं आहेत. 

युरोपमध्ये लहान गावातल्या घरांच्या छपरांवर करकोचे (स्टाॅर्क) घरटी करतात. त्यांची पिल्ले आणि त्यांचे संगोपन पाहून युरोपियन लोकांना करकोच्यांचे खूप आकर्षण वाटते. छपरांवर टोपल्या ठेवून युरोपियन लोक या पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी निमंत्रण देतात. 'मी कसा जन्मलो' असे जेव्हा लहान मुले उत्सुकतेने आई बाबांना विचारतात तेव्हा 'तुला स्टाॅर्क पक्षी घेउन आला' असे युरोपमधले पालक मुलांना सांगतात. अशी दंतकथा आहे. घरात बाळ येण्यासाठी स्टाॅर्कने घरावर घरटे करून अंडी घालणे हा शुभशकुन मानला जातो, असे इंगळहळीकर यांनी सांगितले. पुण्यालगतच्या एका गावात स्टाॅर्क पक्षी दरवर्षी स्वत:चीच बाळं घेऊन येतो. अनेक वर्षे या घरट्याचे ते निरीक्षण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कुदळ्या किंवा ब्लॅक आयबिस पक्षी देखील हल्ली मोबाईल टाॅवर वर घरटी करताना दिसतात. आपल्याकडचा निवासी 'पांढऱ्या मानेचा करकोचा' (वुली नेक्ड स्टाॅर्क) उंच झाडावर घरटे करतो. मात्र इथे त्याने  गावातल्या मोबाईल टाॅवरवर घरट्यासाठी जागा निवडली आहे. या भागात अनेक उंच लोखंडी मनोरे आहेत पण या जोडीने गजबजलेल्या बाजारातला हा मनोरा शोधला आहे. दर वर्षी पावसाळ्यानंतर दोन पिल्ले इथल्या घरट्यात जन्मतात. करकोचे मासे, खेकडे, शिंपले, बेडूक हे त्याचे खाद्य पिल्लांना भरवतात. नर मादी आळीपाळीने खाणे आणणे आणि  कावळ्यांपासून घरट्याचे रक्षण करणे ही कामे करतात.--------------------------------

मोबाईल टाँवरमधील लहरींमुळे शहरातले चिमण्या, साळुंक्या सारखे पक्षी दूर गेलेत हा समज या करकोच्यांनी खोटा ठरवला आहे. आता मोबाईल टाँवर कंपनीने हे घरटं किमान त्यांची पिल्लं मोठी होईपर्यंत तरी काढू नयेत. - डाँ. श्रीकांत इंगळहळीकर, पक्षी अभ्यासक--------------  

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइल