बारामतीत कॉसमॉस बँकेत भरदिवसा चोरी

By Admin | Updated: September 17, 2015 02:35 IST2015-09-17T02:35:27+5:302015-09-17T02:35:27+5:30

बारामती शहरातील कॉसमॉस बँकेतून भरदिवसा अडीच लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १६ ) घडला. अज्ञात चोरट्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये काउंटरसमोरील

Often theft in Baramati Cosmos Bank | बारामतीत कॉसमॉस बँकेत भरदिवसा चोरी

बारामतीत कॉसमॉस बँकेत भरदिवसा चोरी

बारामती : बारामती शहरातील कॉसमॉस बँकेतून भरदिवसा अडीच लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार बुधवारी (दि. १६ ) घडला. अज्ञात चोरट्याने कॅशिअरच्या केबिनमध्ये काउंटरसमोरील काचेतून हात घालून ही रोकड लंपास केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कॉसमॉस बँकेचे लिपिक श्रीराम सुखदेव काळे (वय २६, रा. ढेकळवाडी, ता. बारामती) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. १६) ११ ते ११.४० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. काळे हे बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहेत.
काळे यांनी अडीच लाख रकमेचे ५ बंडल एकत्रित बांधून केबिनच्या
कोपऱ्यात ठेवले होते. त्यानंतर शिपायास आवाज देण्यासाठी ते केबिनच्या
बाहेर गेले. यादरम्यान अज्ञात
चोरट्याने केबिनच्या खिडकीवाटे हात घालून चोरी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बी. बी. भोसले करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Often theft in Baramati Cosmos Bank