अधिका:यांना लावले हुसकावून
By Admin | Updated: November 11, 2014 23:24 IST2014-11-11T23:24:52+5:302014-11-11T23:24:52+5:30
जीव गेला तरी चालेल, पण बाह्यवळण रस्त्याला जमिनी संपादित करून देणार नाही.

अधिका:यांना लावले हुसकावून
दावडी : जीव गेला तरी चालेल, पण बाह्यवळण रस्त्याला जमिनी संपादित करून देणार नाही. रस्ता करावयाचा असेल, तर राजगुरुनगर येथून जाणा:या महामार्गालगतची अतिक्रमणो काढून त्याचे गावातच रुंदीकरण करून रस्ता तयार करा, पण आमची जमीन देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत आज मोजणी करावयास आलेल्या अधिका:यांना शेतक:यांनी हुसकावून लावले.
बाह्यवळणाच्या पहिल्या टप्प्यासाठी होलेवाडी, राक्षेवाडी, चांडोली, ढोरे-भांबुरवाडी या गावांची काही जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी आज राक्षेवाडी, होलेवाडी या दोन गावांच्या शिवेलगत मोजणी करण्यासाठी तहसीलदार प्रशांत आवटे, भूसंपादन उपजिल्हा अधिकारी संजय पाटील, महामार्ग तांत्रिक विभागाचे व्यवस्थापन डी. एस. झोडगे, खेडचे पोलीस निरीक्षक आर. व्ही. इंगवले यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठा फौजफाटा घेऊन आले होते.
राक्षेवाडी, होलेवाडी येथील शेतक:यांनी व महिलांनी आक्रमक होत मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका:यांना घेराव घातला. जीव गेला तरी चालेल, पण बाह्यवळण रस्त्यासाठी जमिनीची मोजणी करून देणार नाही, असा इशारा देत रस्ता करायचा असेल, तर पुणो-नाशिक महामार्गावरील राजगुरुनगरमधील अतिक्रमणो काढून रस्ता तयार करा; पण आमच्या जमिनी रस्त्यासाठी घेऊ नका, आम्हाला भूमिहीन करू नका, अशी भूमिका शेतकरी व महिलांनी आक्रमक होत मांडली व मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिका:यांना हुसकावून लावले. या वेळी पंचायत समिती उपसभापती सतीश राक्षे, होलेवाडीचे उपसरपंच नवनाथ होले, होलेवाडीचे माजी सरपंच निवृत्ती होले, राक्षेवाडीचे माजी सरपंच अशोक राक्षे, बाळासाहेब पवार, विकास होले, विद्या राक्षे, मच्छिंद्र राक्षे, शिवाजी सांडभोर, रवी राक्षे, काळुराम राक्षे यांच्यासह या परिसरातील शेतकरी व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. याबाबत शेतक:यांशी चर्चा करूनच बाह्यवळणाचा योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी सांगितले. (वार्ताहर)