अधिकाऱ्यांनी केले पंचनामे
By Admin | Updated: July 11, 2015 04:22 IST2015-07-11T04:22:02+5:302015-07-11T04:22:02+5:30
आंबेगाव तालुक्यातील लौकी, चांडोली, कारफाटा, वळती, अवसरी येथील टोमॅटोपिकाची पाहणी सिजेंटा कंपनीचे अधिकारी, कृषी खाते व पंचायत समितीच्या

अधिकाऱ्यांनी केले पंचनामे
मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी, चांडोली, कारफाटा, वळती, अवसरी येथील टोमॅटोपिकाची पाहणी सिजेंटा कंपनीचे अधिकारी, कृषी खाते व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आज केली. टोमॅटोपिकाचे सोमवारी नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. नुकसान झालेल्या टोमॅटोचे पंचनामे करण्यात आले.
टोमॅटोपिकाचे नुकसान झाले आहे. फुले व फळधारणा होत नसल्याने शेतकऱ्याने टोमॅटोपिकात शेळ्या-मेंढ्या सोडल्या, असे वृत्त दैनिक ‘लोकमत’मध्ये आले होते. त्याची दखल शासकीय पातळीवर तसेच सिजेंटा कंपनीने घेतली. सिजेंटा कंपनीचे अधिकारी अजित खोटे, चंद्रशेखर बोंडे, अरुण देशमुख यांनी शेतावर जाऊन टोमॅटोपिकाची पाहणी केली. कृषी खात्याचे संजय विश्वासराव, पंचायत समितीचे संताजी जाधव, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे टेमकर यांनी पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्याबाबत चौकशी केली जाईल, असे अजित खोटे यांनी सांगितले. चांगल्या स्थितीत असलेल्या टोमॅटोबागांची पाहणी करण्यात आली.(वार्ताहर)