मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले
By Admin | Updated: October 13, 2015 00:44 IST2015-10-13T00:44:09+5:302015-10-13T00:44:09+5:30
पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय

मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले
पिंपरी सांडस : पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही, असा पवित्रा घेत पिंपरी सांडस पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सर्वपक्षीय कृती समितीने आज मोजणी करण्यासाठी आलेल्या पुणे महापालिका व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध केला. सुमारे दीड हजार ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या संतप्त भूमिका पाहून अधिकाऱ्यांनी परत जाणे पसंत केले.
येथील गट. क्र . ४९३ मधील वन विभागाच्या जागेत हा कचरा प्रकल्प प्र्रस्तावित आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला विरोध दर्शवला आहे.
आज (१२ आॅक्टोबर) कचरा डेपोसाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोजणी करण्याचे ठरवले होते. तशा प्रकारचे पत्र त्यांनी लोणी कंद पोलीस स्टेशनला देऊन संरक्षणामधे मोजणी करणार होते. अधिकारी येणार असल्याची कुणकूण लागताच पंचक्रोशीतील सुमारे दीड हजार ग्रामस्थ येथे ठिय्या मांडून होते. अधिकारी आल्यानंतर ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
आम्ही या कचरा डेपोला विरोध म्हणून आतापर्यंत अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे काढले; मात्र तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी मध्यस्थी करीत जमावाला शांत केले. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोजणी रद्द केली.
या वेळी ग्रामस्थ संतप्त होते. पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही केली असती तर जमावाच्या तीव्र भावनांना सामोरे जावे लागले असते.
या वेळी लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, पंचायत समिती उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, कृती समिती अध्यक्ष विकास लवांडे, शिवसेना तालुकाप्रमुख दौलत पायगुडे, शांताराम कटके, शिवदास उबाळे, कुशाभाऊ गावडे, चंद्रकांत सातव, संजय पायगुडे, विजय पायगुडे, संजय भोरडे, महेश शिंदे, वाल्मीकराव भोरडे, श्रीहरी कोतवाल, सीताराम बाजारे, सुभाष कोतवाल, सतीश भोरडे, राजुअण्णा भोरडे, रवींद्र कंद, रामदास ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, शंकर मांडे, बाळासो भोरडे, प्रकाश भोरडे, सुवर्णा गजरे, अंकुश कोतवाल, विकास कोतवाल, शंकर भोरडे, संपत भोरडे, दत्तात्रय सातव, प्रकाश जमादार, राजेश वारघडे, पांडुरंग हरगुडे, गणेश कुटे यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
आता आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहोत. सरकारने बळाचा वापर केला तर प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ; पण पुण्याचा कचरा येथे टाकू देणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आणि याला सर्वस्वी जबाबदार जिल्हाधिकारी व पालकमंत्री राहतील.
- विकास लवांडे, अध्यक्ष (कृती समिती )