कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे कार्यालये बंद
By Admin | Updated: May 11, 2017 04:13 IST2017-05-11T04:13:13+5:302017-05-11T04:13:13+5:30
पारगाव (ता. दौंड) येथील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामावर हजर नसल्याने कार्यालये बहुतांशी वेळा बंद असल्याचे चित्र आहे.

कर्मचाऱ्यांच्या गैरहजरीमुळे कार्यालये बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथील शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कामावर हजर नसल्याने कार्यालये बहुतांशी वेळा बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गावच्या उत्तरेला प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. उद्घाटनावेळी माजी मंत्री सचिन अहीर यांनी सदर इमारत बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून हे केंद्र चर्चेत आहे. या आरोग्य केंद्राचे कर्मचारी केंद्रात मुक्कामी राहणे अपेक्षित असताना गावामध्ये खोली घेऊन राहत आहेत.
बहुतांशी वेळा आरोग्य केंद्र बंद असते. ही कार्यालय नियमितपणे उघडावी, अशी मागणी ग्रामस्थ मच्छिंद्र ताकवणे यांनी केली आहे. गावच्या दक्षिणेला एकाकी तलाठी कार्यालय आहे.
पारगाव व गलांडवाडीसाठी हे कार्यालय आहे. हे कार्यालय आठवड्यातील एखादा दुसरा अपवाद वगळता नियमित बंद असते. तलाठी फणसे हे खुटबावला राहतात. ग्रामस्थांना तलाठी कार्यालय बंद असल्याने मनस्ताप होतो.