शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

कार्यालये भोर शहरात; मात्र अधिकारी राहतात पुण्यात, वेळेवर कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 16:08 IST

कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

भोर : हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी वगळता बहुतांशी अधिकारी पुण्यात राहतात आणि कार्यालये आहेत भोर शहरात. यामुळे वेळेवर कामे न होणे, अधिकारी न भेटणे अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

भोर तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भोर पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी हे ठराविक अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राहतात. हे वगळता तालुक्यातील बीएसएनएल विभाग, दुय्यम निबंधक भोर उपअधीक्षक भूमिअभिलेख, पशुधन विकास अधिकारी, पशुसंर्वधन उपायुक्त, सहायक निबंधक, उपविभागीय वन अधिकारी, कृषी अधिकारी, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, छोपावी उपअभियंता, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता, पंचायत समिती विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, काही सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, शासकीय आयटीआय, प्राचार्य व प्राध्यापक, शासकीय बँका, सहकारी बँकांचे मॅनेजर व अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी हेही पुण्यात राहतात. दररोज ये-जा करत असतात.

दरम्यान, भोर पंचायत समिती, पशुधन विकास अधिकारी बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, छोपावी, एकात्मिक बालविकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी आठवड्यातून एकदाच आठवड्याच्या बाजाराच्या दिवशीच उगवतात. इतर वेळी त्यांना शोधावे लागते. भोर शहरात प्रशासकीय इमारतीचे काम सुरू आहे. भोर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण विभाग, नळपाणीपुरवठा, बांधकाम विभाग, रोजगार हमी योजना, एकात्मिक बालविकास प्रकल्प आदी कार्यालये, तर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय एकत्र असून उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय राजवाडा चौकात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. उपविभागीय वनअधिकारी कार्यालय भोर शहरात, तर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय भाटघरला आहे. उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय व तालुका कृषी अधिकारी कार्यालय वेताळपेठ येथे आहे. पीआरसी कार्यालय हे पंचायत समिती विश्रामगृह येथे आहे. भोर पोलिस स्टेशन चौपाटी येथे आहे. महावितरणची कार्यालये क्रांती चौकात आहेत. सामाजिक वनीकरण व वनविभाग कार्यालय नसरापूरला आहे.

अधिकारी कार्यालयात नसल्याने नागरिकांचे हेलपाटे

बाहेरून येऊन जाऊन करणारे अधिकारी, डॉक्टर, बँक मॅनेजर कार्यालयात येतात किवा येत नाहीत, वेळेत येतात की नाही, लोकांना भेटतात की नाही, लोकांची कामे होतात किंवा नाही, याबद्दल काहीच समजत नाही. मंगळवारी भोरचा बाजार असतो. यामुळे अनेकजण बाजार करण्याबरोबरच शासकीय कामे करण्यासाठी भोरला येतात. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी भेटत नाहीत. अनेकांचे फोन लागत नाहीत. अनेकजण मीटिंगला असतात. वेळेवर कार्यालयात नसतात. यामुळे कामानिमित्ताने ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून आलेल्या लोकांना एकतर तासनतास वाट पाहावी लागते. अन्यथा काम न होताच परत जावे लागते. यामुळे हेलपाटे मारावे लागतात. विनाकारण वेळ आणि पैसे वाजा जात आहेत. त्यामुळे गैरहजर असलेल्या वेळेवर येत नसलेल्या आणि वेळेपूर्वीच परत जात असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यालयाच्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी मुक्कामी राहत नसतील तर चौकशी करून कारवाई करण्यात येईल. - डॉ. विकास खरात, उपविभागीय अधिकारी, भोर

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र