अधिकारी देणार स्वच्छतागृहांना भेट
By Admin | Updated: July 11, 2015 04:08 IST2015-07-11T04:08:10+5:302015-07-11T04:08:10+5:30
भारत सरकारचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील शालेय स्वच्छतागृहांना भेटी देऊन आढावा घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी

अधिकारी देणार स्वच्छतागृहांना भेट
राजेगाव : भारत सरकारचे अधिकारी पुणे जिल्ह्यातील शालेय स्वच्छतागृहांना भेटी देऊन आढावा घेणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सर्व तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. भारत
सरकारचे देशातील शालेय स्वच्छता बांधकामाचा आढावा घेण्यासाठी संचालक व उपसचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील स्वच्छतागृह बांधकामाचा आढावा घेण्यासाठी संजीव श्रीवास्तव, उपसचिव भारत सरकार हे दि. ९
ते ११ जुलै २०१५ या कालावधीत
पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
यासंदर्भात आपण आपल्या यंत्रणेद्वारे शाळांमध्ये स्वच्छतागृह उपलब्धतेची खात्री करावी, तसेच आढाव्याकरिता शाळाबाह्य स्वच्छतागृहाची माहिती व त्यांची छायाचित्रे उपलब्ध करण्यात
यावीत, अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.
(वार्ताहर)