आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्याने धमकावले

By Admin | Updated: January 9, 2017 03:09 IST2017-01-09T03:09:28+5:302017-01-09T03:09:28+5:30

माहिती अधिकाराअंतर्गत स्थापत्य विभागाच्या कामाबाबत माहिती मागविणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांला महापालिका उपअभियंत्याने जीवे मारण्याची धमकी दिली.

The officer threatened the RTI activist | आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्याने धमकावले

आरटीआय कार्यकर्त्याला अधिकाऱ्याने धमकावले

पिंपरी : माहिती अधिकाराअंतर्गत स्थापत्य विभागाच्या कामाबाबत माहिती मागविणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यांला महापालिका उपअभियंत्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मोरेवस्ती, चिखली येथे घडली. या प्रकरणी आरटीआय कार्यकर्ते सचिन उध्दव शिंदे (वय, रा.३४, यशवंत कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार महापालिका उपअभियंता सुनिल दत्तु नरोटे याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागात उपअभियंता पदावर नरोटे कार्यरत आहेत तर, आरटीआय कार्यकर्ते शिंदे यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या कामाबाबत माहिती अधिकारात माहिती मिळविली होती. या माहितीच्या अधारे शिंदे यांनी तक्रार केली, याचा नरोटे यांना राग होता. नरोटे यांनी त्यांना गुरुवारी रात्री फोन करुन तक्रार मागे घे, असे धमकावत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने नमूद केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: The officer threatened the RTI activist