शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलातील अधिकारी हक्काच्या घरापासून तब्बल १३ वर्षांपासून वंचित, तत्काळ भरपाई देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 09:25 IST

Pune News: पुण्यातील एका विकासकाने सुरक्षा दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनाच तब्बल १३ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची घटना समोर आली आहे.

मुंबई : घराचा ताबा मिळविण्यासाठी विकासकाच्या दारावर हेलपाटे मारणारे सर्वसामान्य ग्राहक आपल्याला पावला पावलावर सापडतील. पण पुण्यातील एका विकासकाने सुरक्षा दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांनाच तब्बल १३ वर्षे हक्काच्या घरापासून वंचित ठेवल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाने याची गांभीर्याने दखल घेत तत्काळ भरपाई देण्याचे आदेश विकासकाला दिले आहेत.विंग कमांडर विवेक भारंबे, ग्रुप कॅप्टन व्ही.ए. चौधरी, लेफ्टनंट कमांडर जे.एस. बाल हे निवृत्त अधिकारी, हवाई दलाच्या सेवेत असलेल्या कॅप्टन अनुपमा महाजन, तसेच डॉ. विजय सूद आणि डॉ. रूपेश बेरी यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भूखंड विकसित करण्यासाठी दिला. पुणेस्थित डिफेन्स सिटी डेव्हलपर या कंपनीने ते कंत्राट स्वीकारले. त्यांना जवळपास ८० टक्के रक्कम अदा केली. परंतु, १३ वर्षे उलटल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे काम सुरू झाले नाही. पाठपुरावा करूनही भूखंड विकसित केले जात नाहीत आणि ताबाही मिळत नसल्याने संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांनी महाराष्ट्र राज्य ग्राहक मंचाकडे धाव घेतली.राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष. डी. आर. शिरासो, डॉ. एस. के. काकडे यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. तक्रारदारांच्या वतीने ॲड. स्मिता सोलवट यांनी बाजू मांडली. वकिलांचा युक्तिवाद आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विकासक कंपनी दोषी असल्याचा निष्कर्ष आयोगाने काढला. तक्रारदारांनी दिलेली एकूण रक्कम आणि त्या रकमेवर १२ टक्के व्याज, तसेच भरपाई म्हणून एक लाख रुपये आणि अर्धवट खर्चाच्या रूपात २५ हजार रुपये तत्काळ देण्याचे आदेश आयोगाने विकासकाला दिले. ही रक्कम आदेश पारित झाल्यापासून एका महिन्याच्या आत परत करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास संपूर्ण रकमेवर १२ टक्के अधिक व्याज द्यावे लागणार आहे. शिवाय तक्रारदारांना जमीन ताब्यात द्यावी, असेही निकालात नमूद केले आहे. 

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील आजी-माजी अधिकाऱ्यांची गेल्या १३ वर्षांपासून अडवणूक सुरू होती. पाच तक्रारींची सुनावणी एकावेळी घेण्यात आली. आयोगाने सर्व कागदपत्रांची बारकाईने पडताळणी केली. निकाल येईपर्यंत १४ महिन्याचा कालावधी लागला. एकूण रक्कम व्याजासहित परत करण्यासह जमीन तक्रारदारांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले.- ॲड. स्मिता सोलवट, तक्रारदारांच्या वकील

टॅग्स :HomeघरPuneपुणे