शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात निवडणूक आयोगाच्या परीक्षेत अधिकारी काठावर पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:13 IST

निवडणूकीच्या प्रकियेबाबत अधिका-यांना कितपत ज्ञान आहे हे पाहण्यासाठी आॅनलाईन पध्दतीनेही परीक्षा घेण्यात आली.

ठळक मुद्देपुणे विभागात २६१ अधिका-यांनी दिली परीक्षा हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच अधिका-यांना २५ पेक्षा अधिक मार्क

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने १४ व १५ मे रोजी राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणा-या उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि उपायुक्त दर्जाच्या अधिका-यांची परीक्षा घेतली. पुणे विभागातून तब्बल २१६ अधिका-यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, तब्बल ९० टक्के अधिकारी काठावर पास झाले असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून यावेळी प्रथमच संपूर्ण देशात निवडणूक प्रक्रिये थेट भाग असलेल्या निवडणूक निर्णय अधिका-यांची परीक्षा घेतली. निवडणूकीच्या प्रकियेबाबत अधिका-यांना कितपत ज्ञान आहे हे पाहण्यासाठी ही परीक्षा घेण्यात आली. आॅनलाईन पध्दतीने घेण्यात आलेली ही परीक्षा ३० मार्काची होती. यासाठी ३० प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल एक तासाचा वेळ देण्यात आला होता. या परीक्षेत पास होण्यासाठी २१ मार्क पडणे आवश्यक होते. गेल्या अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडणा-या अधिका-यांनी ही परीक्षा दिली. यासाठी पुणे विभागात अधिका-याकडून जय्यत तयारी करून घेण्यात आली. आयोगाच्या परीक्षेच्या पूर्वी सरावासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून एक पूर्व परीक्षा देखील घेण्यात आली. त्यानंतर यशदा येथे सर्व अधिका-यांची ३० मार्काची आॅनलाईन परीक्षा घेण्यात आली. यामध्ये परीक्षेच्या वेळी अनेक अधिका-यांकडून कॉपी देखील करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. या परिक्षेचा निकाल नुकताच लागला असून, यामध्ये ९० टक्के अधिकारी काठावर पास झाले असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच अधिका-यांना २५ पेक्षा अधिक मार्क मिळाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकonlineऑनलाइनexamपरीक्षा