आरपीएफमधील अधिकाऱ्याची फसवणूक
By Admin | Updated: December 14, 2015 00:28 IST2015-12-14T00:28:15+5:302015-12-14T00:28:15+5:30
एटीएममधून पैसे चुकीच्या पद्धतीने काढत असल्याचे सांगत केंद्रीय रेल्वे पोलीस दलातील (आरपीएफ) निरीक्षकाच्या एटीएमची अदलाबदल करून २० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

आरपीएफमधील अधिकाऱ्याची फसवणूक
पुणे : एटीएममधून पैसे चुकीच्या पद्धतीने काढत असल्याचे सांगत केंद्रीय रेल्वे पोलीस दलातील (आरपीएफ) निरीक्षकाच्या एटीएमची अदलाबदल करून २० हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे पोलिसांनी आयाज कासम शेख (वय ३२, रा. मोरेवस्ती) याला अटक केली. सोमनाथ मदनकिशोर तिवारी (वय ५५, रा. पुणे रेल्वे स्टेशन मुख्यालय) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २४ आॅगस्टला पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली. तिवारी हे एटीएम सेंटरमधून पैसे काढत असताना पाठीमागील एकाने तुम्ही चुकीच्या पद्धतीने पैसे काढत आहात, असे सांगून कार्डची अदलाबदल केली व त्या कार्डाद्वारे २० हजार रुपये काढले.