माणिकबाग येथे कार्यालय व सहा कारची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:12 IST2021-04-08T04:12:43+5:302021-04-08T04:12:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कंपनी कार्यालयाच्या पायरीवर का थुंकलास, असे विचारल्यामुळे त्यातून दोघांनी कंपनी कार्यालयात शिरून ...

Office and six cars vandalized at Manikbagh | माणिकबाग येथे कार्यालय व सहा कारची तोडफोड

माणिकबाग येथे कार्यालय व सहा कारची तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कंपनी कार्यालयाच्या पायरीवर का थुंकलास, असे विचारल्यामुळे त्यातून दोघांनी कंपनी कार्यालयात शिरून तोडफोड करून रस्त्यावर बाहेर थांबलेल्या ६ कारची दगड मारून तोडफोड केल्याची घटना सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग येथे बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हनुमान ज्ञानदेव मोरे (वय २९) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

येथील आयबी ऑटोमेशन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या कार्यालयाबाहेर पायरीवर दोघे जण बसले होते. पायरीवर का थुंकलास, कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे, असे फिर्यादीने त्यांना विचारले. त्यामुळे त्या दोघांनी त्याला, तू काय इथला भाई आहेस का, मला ओळखले का, मी सिंहगड रोडचा भाई आहे, तुला खलास करून टाकीन, असे धमकावून फिर्यादीस मारहाण केली व आत घुसून कॉम्प्युटर, फर्निचर, व कार्यालयाच्या काचा दगडाने फोडल्या.

तसेच बाहेर उभ्या असलेल्या ६ कारच्या काचा दगडाने फोडल्या. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात करण अर्जुन दळवी व हनुमान या दोघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

Web Title: Office and six cars vandalized at Manikbagh