मारहाण करणा-या पोलिसावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:45 IST2017-08-05T03:45:30+5:302017-08-05T03:45:30+5:30

येथील पवनानगर रोडवरील बौर गावच्या हद्दीतील बौर खिंड येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस नाईकसह त्याच्या चार साथीदारांनी एका जीपला दगड मारून अडवले.

 Offense of Policeman | मारहाण करणा-या पोलिसावर गुन्हा

मारहाण करणा-या पोलिसावर गुन्हा

कामशेत : येथील पवनानगर रोडवरील बौर गावच्या हद्दीतील बौर खिंड येथे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या एका पोलीस नाईकसह त्याच्या चार साथीदारांनी एका जीपला दगड मारून अडवले. जीपमधील इसमाला मारहाण करून पैशाची मागणी करत पैसे नाही दिल्यास मोठ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या पोलिसाविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या पाच आरोपींना शुक्रवारी वडगाव न्यायालयाने जामीन दिला.
गुरुवारी दुपारी बौर गावच्या हद्दीत येथे अविनाश रमेश साळवे (वय २५, रा. करुंज) जीप (एम एच १४ डी एस ३८७४) मधून जात होते. बौर खिंडीत पोलीस नाईक श्रीधर जनार्धन पाटील (वय ४१) यांनी व त्यांच्या चार साथीदार वेणुदास गणपत यादव (४५), शेखर ज्ञानोबा
घरकुडे (४२), सतीश बबन जेधे
(४६) व अक्षय देविदास नाईक (२४, सर्व रा. कात्रज, पुणे) यांनी दगड मारून जीप अडवली.

Web Title:  Offense of Policeman