मारहाण करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा

By Admin | Updated: February 26, 2017 03:29 IST2017-02-26T03:29:05+5:302017-02-26T03:29:05+5:30

पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचा उमेदवार दीपक जाधव व त्याचा भाऊ व सहकाऱ्यावर शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

Offense of a candidate who has beaten up | मारहाण करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा

मारहाण करणाऱ्या उमेदवारावर गुन्हा

इंदापूर : पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचा उमेदवार दीपक जाधव व त्याचा भाऊ व सहकाऱ्यावर शनिवारी इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गलांडवाडी नं.१ गावच्या हद्दीत सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सुभाष विठ्ठल तुपे (वय ३० वर्षे, रा. गलांडवाडी नं.१) असे त्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीवरुन दीपक बाळासाहेब जाधव, गोविंद दत्तू जाधव, उमेश राजेंद्र जाधव,दिनेश बाळासाहेब जाधव, रोहित दत्तू जाधव, भारत निवृत्ती जाधव, सागर श्रीहरी जाधव (सर्व रा. गलांडवाडी नं.१, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उसने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात जमिनीची मागणी करुन लोखंडी पाईप,लाकडी दांडक्याने मारहाण करीत गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तुपे याने तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीपक जाधव यांच्याकडून फियार्दीने ५० हजार रुपये उसने घेतले होते. या प्रकरणातूनच आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फियार्दीस मारहाण केली.
या संदर्भात दीपक जाधव यांनी सांगितले की , माझा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. राजकिय हेतूने प्रेरीत होवून मला बदनाम करण्याचा कट आहे.

Web Title: Offense of a candidate who has beaten up