शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आमदार भरणेंबद्दल अपशब्दप्रकरणी गुन्हा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:19 IST

आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

इंदापूर / लासुर्णे : आमदार दत्तात्रय भरणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून एकाविरुद्ध काल (दि. ३) इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.बबलू पठाण (रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष गणेश भोंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते.याबाबत हकीकत अशी : आज दुपारी आरोपी पठाण याने सोशल मीडियाने आमदार भरणे यांच्याबद्दल अपमानकारक लिखाण करून त्यांची बदनामी केल्याची बाब गणेश भोंग यांच्या लक्षात आली.याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे, नगरसेवक पोपट शिंदे, गजानन गवळी, नवनाथ रूपनवर, महादेव व्यवहारे, अण्णा वाघमोडे यांना कल्पना दिली.या सर्वांच्या सह्यांचे निवेदन तयार करून ते पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्याकडे दिले. आरोपी पठाण याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना भोंग म्हणाले, की आरोपी पठाणवर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे. तिची पूर्तता झाली नाही, तर आंदोलनात्मक पवित्रा उचलला जाईल.दरम्यान, आरोपीवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपासानंतर योग्य ते पाऊल उचलले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाnewsबातम्या