आॅनलाइन विरोधात औैषधविक्रेते १४ आॅक्टोबरला संपावर
By Admin | Updated: October 8, 2015 05:36 IST2015-10-08T05:36:50+5:302015-10-08T05:36:50+5:30
आॅनलाइन फार्मसीविरोधात आता देशभरातील औैषधविक्रेते आक्रमक झाले आहेत. येत्या १४ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय औैषधविक्रेते संघटनेने संपूर्ण देशभरात बंद

आॅनलाइन विरोधात औैषधविक्रेते १४ आॅक्टोबरला संपावर
पुणे : आॅनलाइन फार्मसीविरोधात आता देशभरातील औैषधविक्रेते आक्रमक झाले आहेत. येत्या १४ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय औैषधविक्रेते संघटनेने संपूर्ण देशभरात बंद पुकारला आहे. या बंदमध्ये राज्य केमिस्ट संघटनेचे तब्बल ५५ हजार औैषधविक्रेते व देशभरातील सुमारे ८ लाख विक्रेते सहभागी होतील, अशी माहिती राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी दिली.
राज्यात ई-फार्मसीच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे औैषधविक्रीचा व्यवसाय सुरू आहे. यामध्ये धोकादायक औैषधांची विक्री होत आहे. वेळोवेळी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने औैषधविक्रेता संघटनेने ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औैषधे घेणे चुकीचे असून, यावर लवकरात लवकर निर्बंध आणावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने वारंवार केली जात आहे. अशा ई-फार्मसीमुळे ग्रामीण भागात जीवनरक्षक औैषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विक्रेत्यांचा तोटा होत असून, त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट आले आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.