शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 18:31 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे.

ठळक मुद्देगाढव खरेदी करताना पाहिले जात होते त्याचे दात व वय गाढवाबरोबरच धनगरी घोड्यांचाही भरला होता बाजार

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरीत दोन दिवस भरलेल्या गाढवांच्या बाजारात दोन कोटींवर रुपयांची उलाढाल झाली आहे. पौष पौर्णिमा यात्रा असल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती.दरवर्षी पौष पौर्णिमेला जेजूरीत मोठी यात्रा भरते. वैदू, कोल्हाटी, बेलदार, कैकाडी, वादारी, कुंभार, डोंबारी, परीट, पाथरवट, गारुडी आदी जाती-जमातींचे लोक यात्रेनिमित्त जेजूरीत आले आहेत. या जाती जमातीतील अनेक लोकांचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे. माती, विटा, वाळू, डोंगर पठारावर ओझी वाहून नेहण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. दरवर्षी तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत कुलदैवताच्या दर्शन बरोबरच गाढवांचा खरेदी विक्रीसाठी मोठ्या संख्येने लोक येतात. आधुनिक यंत्रयुगात वाहनाचा वापर वाढल्याने गाढवाच्या पाठीवरील ओझे कमी झाले आहे व त्यामुळे गाढवांच्या बाजाराला दिवसेंदिवस उतरती कळा सुरु झाली आहे. जेजुरीत काल रविवार (दि ३१) पासून बंगाली पटांगणात गाढवाच्या बाजाराला सुरुवात झाली. येथे जागा कमी पडत असल्याने पालखी तळावर ही बाजार भरलेला होता. या बाजारासाठी गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक या बरोबरच राज्यातील पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, जालना, नांदेड आदी भागातून व्यापारी तसेच विविध जाती-जमातीचे लोक या बाजारात सहभागी झाले होते. गाढव खरेदी करताना त्याचे दात व वय पाहिले जात होते. दोन दाताचा दुवान, चार दाताचा चवान, कोरा अखंड अशी निवड करून गाढवांची किं मत ठरवली जात होती. गावठी गाढवांना पाच हजारापासून किंमत मिळाली तर गुजरातमधील काटेवाडी गाढवांना सुमारे पंधरा ते तीस हजार रुपयापर्यंत किंमत मिळाली. या बाजारात दोन अधिक गाढवांची विक्री होऊन दोन कोटींवर रुपायांची उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गाढवाबरोबरच धनगरी घोड्यांचाही बाजार येथे भरला होता. सुमारे पन्नास घोडे विक्रीसाठी आले होते. पौष पोर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राPuneपुणे