भावात अचानक घसरण  टमाट्याचे दर कोसळल्याने आर्थिक उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:07 PM2017-12-17T23:07:13+5:302017-12-18T00:19:45+5:30

राज्यातील लातूरसह आंध्र प्रदेश, कर्नाटकचा टमाटा विविध बाजारपेठांमध्ये पोहचल्याने टमाट्याच्या भावात अचानक घसरण झाली आहे.

Sudden fall in prices has led to a decline in the rate of tomatoes | भावात अचानक घसरण  टमाट्याचे दर कोसळल्याने आर्थिक उलाढाल मंदावली

भावात अचानक घसरण  टमाट्याचे दर कोसळल्याने आर्थिक उलाढाल मंदावली

Next
ठळक मुद्देबाजारात पाच रु पये प्रतिकिलोपेक्षा खालीकर्नाटक व लातूरचा टमाटा उपलब्ध

वणी : राज्यातील लातूरसह आंध्र प्रदेश, कर्नाटकचा टमाटा विविध बाजारपेठांमध्ये पोहचल्याने टमाट्याच्या भावात अचानक घसरण झाली आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालही मंदावली आहे.
काही दिवसांपूर्वी ५० रु पये प्रतिकिलोने विक्र ी झालेला टमाटा आज घाऊक बाजारात पाच रु पये प्रतिकिलोपेक्षा खाली आला आहे. टमाटा उत्पादित भागांमध्ये परतीचा पाऊस व असमतोल हवामानाचा टमाट्यावर प्रतिकूल परिणाम होऊन उत्पादनात घट झाली होती. स्थानिक बाजारांबरोबर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिसा, कोलकता आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात टमाट्याला मागणी वाढली होती. त्यात प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील दर्जेदार टमाटा विविध राज्यात पोहचला होता. घाऊक बाजारात टमाट्याला ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा भाव उत्पादकांना मिळत होता. भावात सुधारणा झाल्याने उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल झाली. रोज जिल्ह्यातून शेकडो ट्रक परराज्यात जात होते. त्यामुळे टमाटा उत्पादकांच्या आशा उंचावल्या होत्या. दरम्यान लातूर, कर्नाटकचा टमाटा देशात सर्वत्र पोहचल्याने टमाट्याच्या भावात घसरण झाली. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथे टमाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. परराज्यातील व्यापाºयांना या माध्यमातून खरेदीत पर्याय मिळतो. तुलनात्मकरीत्या परराज्यातील टमाटा कमी भावात विकला जातो. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने त्याचा परिणाम भावावर होऊन दरात घसरण झाल्याची माहिती टमाटा व्यापारी व निर्यातदार संजय ऊंबरे यांनी दिली. नाशिकच्या टमाट्याला ज्या राज्यांमधून मागणी होती तेथे
आंध्र प्रदेश, कर्नाटक व लातूरचा टमाटा उपलब्ध झाल्याने टमाट्याच्या भावात घसरण झाली. त्यामुळ आर्थिक उलाढालही मंदावली आहे.

Web Title: Sudden fall in prices has led to a decline in the rate of tomatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार