शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान, अफगाणिस्तानचा सुकामेवा ईद निमित्त बारामतीच्या बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 13:23 IST

रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो.

ठळक मुद्देरमजान ईदसाठी बाजार फुलला : खारकेचे दर तिपटीने वाढले पाकिस्तानातून आयात होणाऱ्या खारकेवर ३०० टक्के कर अमेरिकेतून बदाम, कर्नाटक, गोव्यातून काजू, अफगाणिस्तानमधून चारोळे, पिस्ता, केरळची विलायची बाजारात उपलब्ध

बारामती : रमजान ईद दोन दिवसांवर आली असल्याने ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घराघरात शिरखुर्मा आणि सुकामेव्याचा बेत असतो. त्यामुळे बाजारात सध्या अमेरिका, अफगाणिस्तान, पाकिस्तान आदी देशांतून सुकामेवा बाजारात उपलब्ध झाला आहे, तर ईदच्या सणासाठी पाकिस्तानमधून आलेली खारीक बाजारात उपलब्ध आहे. मात्र, भारत-पाकिस्तानच्या तणावपूर्ण संबंधांचा खारकेच्या दरावर मोठा परिणाम झालेला पाहावयास मिळत आहे. पाकिस्तानातून आयात होणाऱ्या खारकेवर ३०० टक्के कर लावण्यात आला आहे. त्यामुळे खारकेच्या प्रतिकिलो दरात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी ७० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने असणारी खारीक यंदा २२० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. याशिवाय अमेरिकेतून बदाम, कर्नाटक, गोव्यातून काजू, अफगाणिस्तानमधून चारोळे, पिस्ता, केरळची विलायची बाजारात उपलब्ध आहे. काश्मीरमधून केशर उपलब्ध आहे.मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. यात मुस्लिम बांधव एक महिन्याचे उपवास करून रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा करतात. ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो, ही परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे, शिरखुर्मा बनवण्याचा उद्देश म्हणजे या दिवशी नातेवाईक मित्रमंडळी यांना ईदच्या शुभेच्छा देऊन प्रत्येकाचे तोंड गोड केले जाते. शिरखुर्मा बनवण्यासाठी आवश्यक साहित्याची दुकाने बारामती शहरातील बाजारपेठेत थाटली आहेत.  काजू, बदाम, पिस्ता, चारोळे, बेदाणे, खसखस, इलायची, खारीक, खोबरे, शेवई, बडीशेप, केशर या सुकामेव्याचा शिरखुर्मा बनवण्यासाठी वापर केला जातो.

..............सुकामेव्याच्या किमतीमध्ये मागील वर्षापेक्षा यंदा तीस टक्के वाढ झाली आहे. खारकेचे मोठे उत्पादन पाकिस्तानमध्ये होते. कर लावल्याने किमतीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय शिरखुर्मा बनवण्यासाठी शेवई महत्त्वाचा पदार्थ आहे. शेवईमध्ये लखनऊ, लच्छ, गणेश शेवई, साधी शेवई हे शेवइचे प्रकार विक्रीस आहेत. काजू, बदाम यांच्या आकारावर दर ठरतो. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद थोडा कमी आहे.असिफ शेख  - सुकामेवा व्यापारी

टॅग्स :BaramatiबारामतीMuslimमुस्लीमAfghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान