निरीक्षणगृहातील जीवघेणे ‘गट समुपदेशन’

By Admin | Updated: February 24, 2015 01:37 IST2015-02-24T01:37:27+5:302015-02-24T01:37:27+5:30

परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या वाटेवर गेलेल्या चिमुकल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षणगृहांमध्ये

In the observation hall of the 'group counseling' | निरीक्षणगृहातील जीवघेणे ‘गट समुपदेशन’

निरीक्षणगृहातील जीवघेणे ‘गट समुपदेशन’

पुणे : परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या वाटेवर गेलेल्या चिमुकल्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरीक्षणगृहांमध्ये गृ्रुप कौन्सिलिंग संकल्पना राबवली जाते. मात्र ही संकल्पनाच या मुलांच्या जीवावर बेतत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलांचे संवादकौशल्य वाढवणे, त्यांच्यातील आवडी-निवडी जाणून घेणे आणि त्यांच्या मानसिकतेचाही अभ्यास करणे यासाठी ही संकल्पना असताना, प्रत्यक्षात मात्र या गु्रप कौन्सिलिंगमधूनच दोन निष्पाप जीवांचे खूनही झाले आहेत. त्यामुळे कौन्सिलिंग बंद करण्याची मागणी वारंवार होत आहे. मात्र अद्याप याची कोणीही दखल घेत नाहीये हे दुर्दैव!

सध्या निरीक्षणगृहांमध्ये लहान मुलांच्या मूलभूत गरजा भागविल्या जाव्यात, अशी सर्व सुस्थिती आहे. अशा चांगल्या वातावरणाला गट समुपदेशनाच्या प्रकाराने गालबोट लागल्याचे तेथील बालकांशी केलेल्या संवादातून पुढे येत होत्या.
मुलांशी संवादाच्या माध्यमातून सुधारणा व्हावी या भावनेने मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ‘गट समुपदेशन’ करण्यास सुरुवात झाली, मात्र याचा उलट प्रभाव होत असल्याचे ‘लोकमत पाहणी’मध्ये निदर्शनास आले आहे. ग्रुप कौन्सिलिंगमध्ये निरीक्षणगृहातील व तिथून बाहेर पडलेल्या मुलांना एकत्रित आणून त्यांचे एकत्रित समुपदेशन केले जाते हा अभिनव उपक्रम असला तरी यामधील घातक बाब ही आह,े की एकाच कलमाखालील मुलांना एकत्र आणले जाते. चोरीचे गुन्हे, दरोड्यातील, खुनातील अशी कलमांनुसार वर्गवारी करून एकत्रित आणले जाते. एका वेळी शंभर जण एकत्र येतात.
अनेकदा या मुलांमध्येही गट-तट असतात. पूर्ववैमनस्य असते. अशा ग्रुप कौन्सिलिंगने ते एकत्र आल्याने त्यांच्यातील वैर वाढते तर काही वेळा घट्ट मैत्री होऊन ‘निराळ्याच वाटा’ निर्माण होत आहेत. या ओळखीतून गुन्ह्यांसाठींची संघटनाही तयार होण्याची भीती निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांना जाणवत आहे. वैमनस्याच्या भावनेतून वर्षभरात बाल न्याय मंडळाच्या परिसरातच दोन जीव गेले आहेत.

Web Title: In the observation hall of the 'group counseling'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.