सोमेश्वर कारखान्याकडून 1क् लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

By Admin | Updated: November 11, 2014 23:28 IST2014-11-11T23:28:12+5:302014-11-11T23:28:12+5:30

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील अर्धशतकाहून अधिक काळात या परिसरातील शेतक:यांच्या विकासाला हातभार लावला आहे.

Objective of crushing 1 million tonnes of sugarcane crop from Someshwar factory | सोमेश्वर कारखान्याकडून 1क् लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

सोमेश्वर कारखान्याकडून 1क् लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

महेश जगताप ल्ल सोमेश्वरनगर
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील अर्धशतकाहून अधिक काळात या परिसरातील शेतक:यांच्या विकासाला हातभार लावला आहे. यंदाच्या गळीत हंगामात 1क् लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे आव्हान कारखान्यापुढे आहे. मागील वर्षी उत्पादित झालेल्या सर्व साखरेची विक्री करण्यात कारखान्याला यश आले आहे. आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी हा गळीत हंगाम महत्त्वाचा ठरणार आहे.
 सहकार महर्षी कै. मुगुटराव काकडे यांनी परिसरातील शेतक:यांचे हित डोळय़ासमोर ठेवून 1962 साली सोमेश्वरच्या उजाड माळरानावर सोमेश्वर कारखान्याची स्थापना केली.   कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती, पुरंदर, फलटण, पारगाव, खंडाळा असे आहे. नीरा खो:यातील अग्रगण्य कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. काळानुसार कारखान्याने गाळपक्षमता वाढविण्यासाठी यंत्रणोत बदल केला. त्याचबरोबर सहवीजनिर्मिती प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प, कंपोस्ट खत, बायोगॅस असे प्रकल्प राबविले आहेत.              
1959 मध्ये कारखाना उभारणीला सुरुवात झाली. तीन वर्ष कारखान्याचे काम चालले. 1962 साली कारखान्याचा पहिला हंगाम पार पडला. सुरुवातीच्या काळात कै. मुगुटराव काकडे यांनी कारखान्याची धुरा सांभाळली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे धाकटे बंधू कै. बाबालाल काकडे यांनी कारखान्याची जबाबदारी पार पाडली. कारखान्यात 1992 ला सत्तांतर झाले. कारखाना काकडे गटाकडून पवार गटाकडे गेला. वसंतकाका जगताप, राजवर्धन शिंदे, शहाजी काकडे यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे कारखान्याची जबाबदारी आहे. शासनाच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या फुले 265 या जातीच्या उसाच्या लागवडीला सर्वप्रथम या कारखान्याने प्रोत्साहन दिले. तसेच, पाण्याचे नियोजन योग्य व्हावे, यासाठी ऊसउत्पादक शेतक:यांना ठिबक सिंचनसाठी प्रोत्साहन दिले. सध्या 13 हजार हेक्टरवर ठिबक सिंचन सुरू करण्यास कारखान्याला यश आले आहे. त्यासाठी शेतक:यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला.
उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक संकुलाची उभारणीदेखील कारखान्याने केली आहे.  2क्14-15 च्या गळीत हंगामाला सामोरे जाताना कारखाना सध्या आर्थिक अडचणीत आहे. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हा गळीत हंगाम महत्त्वाचा आहे.  या हंगामासाठी 27 कोटी रुपये ऊसतोडणी वाहतुकीसाठी कारखान्याने स्वभांडवलातून उभा केले आहे. कामगारांना 15 टक्के बोनस दिला. कारखान्यावर मुदत कर्ज 75 कोटी, अल्पमुदत कर्ज 12क् कोटी इतके आहे. गेल्या वर्षी 1क् लाख 53 हजार साखरपोत्यांचे उत्पादन केले होते. साखरेच्या दरातील चढउतार असताना कारखान्याची सर्व साखर विक्री झाली आहे. 
 
कारखान्याकडे शिल्लक साखर नाही. परंतु, येणा:या हंगामात साडेअकरा ते बारा लाखांच्या आसपास नवीन पोती तयार होतील. सध्या साखरेचे दर 26क्क् ते 265क् रुपयांवर आले आहेत. 
- सुभाष धुमाळ,
 प्र. कार्यकारी संचालक
 
सोमेश्वर कारखान्यापुढे चालू वर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचे संकट आहे. तरीही योग्य नियोजन आणि तोडणी, वाहतूक यंत्रणोचा योग्य वापर करून सर्व दहा लाख टन उसाचे गाळप करणार आहे. तसेच, सहा कोटी वीज युनिट विक्रीच्या उद्दिष्टासह डिस्टिलरीमधून 9क् ते 95 लाख लिटर अल्कोहोल निमिर्तीचे उद्दिष्ट आहे.  
- पुरुषोत्तम जगताप, 
अध्यक्ष सोमेश्वर कारखाना
 
चालू गळीत हंगामात तुटणा:या उसाला शेतकरी संघटनांनी पहिली उचल 27क्क् रुपये मागितली आहे. आजच स्थापन झालेले ऊसदर नियंत्रण मंडळ जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.; परंतु गेल्या हंगामात सोमेश्वरने 121 रुपये एफआरपी चोरली होती. त्याचा निकाल लवकरच लागणार असून, तो लागताच कारखान्याने ताबडतोब व्याजासह ते पैसे सभासदांना अदा करावेत; अन्यथा नाइलाजास्तव शेतकरी कृती समितीला कारखाना बंद ठेवावा लागेल.   
- सतीश काकडे, 
नेते शेतकरी कृती समिती

 

Web Title: Objective of crushing 1 million tonnes of sugarcane crop from Someshwar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.