मतदार यादीबाबत मागविल्या हरकती
By Admin | Updated: February 20, 2016 00:49 IST2016-02-20T00:49:37+5:302016-02-20T00:49:37+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ जागा ‘अ’ विद्यानगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेणेसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला कळविला आहे.

मतदार यादीबाबत मागविल्या हरकती
आकुर्डी : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ जागा ‘अ’ विद्यानगर या प्रभागाची पोटनिवडणूक घेणेसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला कळविला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी
तयार केली असून, त्यावर २७ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे.
मार्च २०१२मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जगदीश शेट्टी प्रभाग क्रमांक ८ (अ)मधून (विद्यानगर) निवडून आले. मात्र, विभागीय जात पडताळणी समितीने शेट्टी यांचा जात दाखला अवैध ठरवला आहे. निवडणूक आयोगाने या जागेसाठी पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक ८ची प्रारूप मतदार यादी तयार केली आहे. मतदार यादीमध्ये काही हरकती व सूचना असल्यास त्यासंबंधी २० ते २७ फेबु्रवारीदरम्यान महापालिका मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थानिक संस्था कर विभागाचे कार्यालय, निगडी, प्राधिकरणातील ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, आकुर्डीतील सहायक मंडलाधिकारी विभागीय कार्यालय, आकुर्डीतील तहसील कार्यालय या ठिकाणी लेखी अर्ज सादर करता येणार आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी तयार केली असून, त्यावर २७ फेबु्रवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल होतील. (प्रतिनिधी)