शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेल्या तेलाच्या नोंदी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 02:11 IST

एफएसएसएआयचा निर्णय : वारंवार तेल तळण्यासाठी वापरण्यास मनाई

पुणे : विविध खाद्यपदार्थ तळण्यासाठी वारंवार वापरले जाणारे तेल शरीरासाठी हानिकारक असल्यामुळे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पुढील काळात खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या उत्पादकांना तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाच्या नोंदी ठेवावा लागणार आहेत. परिणामी, नागरिकांना सकस आणि आरोग्यदायी खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

काही वर्षांपासून भारतीय खाद्य संस्कृतीत खूप बदल झाले आहेत. त्यातच फास्टफूडचा जमाना आल्यामुळे तरुणाईपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना तळलेले, चमचमीत पदार्थ आवडतात. तसेच, बदलत्या संस्कृतीमुळे तळलेले पदार्थ खाणाºयांची संख्या मोठी आहे. बंद पाकिटातील विविध प्रकारच्या वेफर्सपासून ते आॅर्डर करून घरपोच मागविल्या जाणाºया सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता तपासली जात नाही. घरातही तळल्या जाणाºया विविध पदार्थांसाठीसुद्धा वारंवार वापरलेले तेल उपयोगात आणले जाते. मात्र, हे तेल शरीरासाठी हानिकारक आल्याबाबतची अनेकांना जाणीव नसते. तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एफएसएसएआयने तळण्यासाठी वापरल्या जाणाºया तेलाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले आहे. तसेच, राज्यातील अन्न व औषध प्रशासनाला या संदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तेल वारंवार तळण्यासाठी वापरल्यास त्यात रासायनिक बदल होतात. या तेलाचा पुनर्वापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे दररोज ५० लिटरपेक्षा जास्त खाद्य तेलाचा वापर करणाºया उत्पादकांना कोणत्या कंपनीचे तेल वापरले जाते, याची नोंद ठेवावी लागेल. तसेच, तेलातील पोलर घटक तपासावा लागेल. त्याचप्रमाणे किती लिटर तेल वापरले जाते व किती कालावधीनंतर पुन्हा ते उपयोगात आणले जात नाही, याची नोंद एफएसएसएआयच्या परिपत्रकानुसार बंधनकाकर असेल.दररोज तीनशे टन खाद्यतेलाची होते शहरात विक्रीशहरामध्ये सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची दररोज प्रत्येकी १०० टनांची विक्री होते. तर, पामतेल ७० ते ८० टन आणि सरकी तेलाची ३० ते ४० टन विक्री होती. घरगुती आणि व्यवसायासाठी सोयाबीन व सूर्यफूल या तेलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याखालोखाल पाम तेलाला हातगाडीवरील विक्रेत्यांकडून अधिक मागणी असते. तर, फरसाण विक्रेते सरकी तेलाचा अधिक वापर करतात. घाऊक बाजारात सोयाबीनच्या १५ किलो डब्याचा भाव १,२७० ते १,३२५, तर सूर्यफुलाच्या १५ लिटर डब्याचा भाव १,२५० ते १,३५० रुपये इतका आहे. पामतेलाच्या १५ किलो डब्याचा भाव १,०५० ते १,१५० आणि सरकी तेलाच्या डब्याचा भाव १,१५० ते १,३२० इतका आहे.च्एफडीएच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार वापरल्या जाणाºया तेलातील ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. चांगले कॉलेस्टरॉल कमी होऊ न अपायकारक कॉलेस्टरॉलमध्ये वाढ होते.च्इन्शुलिनमध्ये घट होते आणि लठ्ठपणाही वाढतो. त्यातून हृदयाचे आजार किंवा हृदयविकाराचे झटके येऊ शकतात. त्यामुळेवारंवार तळलेले तेल वापरात आणू नये, याबाबत खबदारीघेतली जात आहे.खाद्यतेलाचा एक उत्कलन बिंदू (बॉयलिंग पॉर्इंट) असतो. त्यापुढे सतत तेल तापत राहिल्यास अथवा एकदा तापवून थंड झालेले तेल पुन्हा तापविल्यास त्यात रासायनिक बदल होतात. असे तेल सेवनात आल्यास शरीरात ट्रान्सफॅटचे प्रमाण वाढते. ट्रान्सफॅट शरीरासाठी अत्यंत घातक असते. त्यामुळे लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका संभवतो. घरातदेखील एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नये. जर, उरलेल्या तेलाची फोडणी करून ठेवावी. अशा फोडणीचा योग्य त्या पदार्थांमध्ये करावा.- कस्तुरी पाध्ये, आहारतज्ज्ञ 

टॅग्स :Puneपुणे