पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांना आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 05:00 AM2018-08-06T05:00:04+5:302018-08-06T05:00:15+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १५ विषयांच्या अभ्यास मंडळावरील काही सदस्यांच्या नियुक्त्या नियम डावलून झाल्याच्या तक्रारी प्राध्यापकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केल्या आहेत.

The objection to the appointments of the Pune University Study Circle | पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांना आक्षेप

पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांना आक्षेप

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १५ विषयांच्या अभ्यास मंडळावरील काही सदस्यांच्या नियुक्त्या नियम डावलून झाल्याच्या तक्रारी प्राध्यापकांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केल्या आहेत. विभागप्रमुख असतानाही सदस्य नेमणे, कोणत्या निकषाखाली नियुक्ती करण्यात आली ते स्पष्ट न करणे, ठराविक लोकांच्याच मुलाखती घेणे, नोटिफेकशन न काढणे आदी बाबींवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत.
महाराष्टÑ सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (८) नुसार नुकत्याच १५ अभ्यास मंडळांवरील सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विषयांच्या अभ्यास मंडळासाठी प्रत्येकी ६ सदस्यांची निवड जाहीर करावयाची आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, अर्थशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, विधि, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, शिक्षण आदी विषयांच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. मात्र यातील अनेक नियुक्त्या नियमबाह्य पद्धतीने झाल्या असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
विद्यापीठाकडून आणखी ६० पेक्षा जास्त विषयांच्या अभ्यास मंडळांवरील सदस्यांची निवड अद्यापही बाकी आहे, त्या वेळी या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये
अशी मागणी प्राध्यापकांनी केली आहे.
>अजून तक्रार नाही
अभ्यास मंडळांवरील नियुक्त्यांबाबत अद्याप अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यास त्याची शहानिशा करून योग्य त्या सुधारणा केल्या जातील.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

Web Title: The objection to the appointments of the Pune University Study Circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे