ओबीसी आरक्षित जागेवर ओबीसी नियुक्तच हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:11 IST2021-02-07T04:11:36+5:302021-02-07T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षित असेल तर त्या पदावर इतर मागासवर्गीय गटातून निवडून आलेल्या ...

ओबीसी आरक्षित जागेवर ओबीसी नियुक्तच हवा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) आरक्षित असेल तर त्या पदावर इतर मागासवर्गीय गटातून निवडून आलेल्या उमेदवारालाच पात्र धरावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने केली आहे.
पक्षाच्या वतीने याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत निडणूका झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी निवडणूक सुरू होणार आहे. अनेक ठिकाणी सरपंचपद ओबीसीसाठी राखीव आहे. तिथे जे ओबीसी उमेदवार ओपन जागेवरून निवडून आले आहेत ते ओबीसी प्रमाणपत्र मिळवत आहे. असे करून ते ओबीसी राखीव उमेदवाराच्या हक्कावर गदा आणत आहेत असे आरपीआयचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी अशा ठिकाणांची त्वरीत दखल घ्यावी. ओपन मधून निवडून आलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार नाही हे पहावे. तरीही काहींनी सादर केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, कोणत्याही स्थितीत ओबीसी मधून निवडून आलेला उमेदवारच ओबीसी राखीव सरपंचपदावर असेल याची काळजी घ्यावी अशी मागणी प्रकाश झुरूंगे यांनी निवेदनात केली आहे.