ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST2020-12-04T04:29:38+5:302020-12-04T04:29:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने गुरूवारी ...

OBC's Rescue Rescue Morcha today | ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा आज

ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा आज

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने गुरूवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. त्यासाठीच्या नियोजनाची बैठक सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत बुधवारी दुपारी सेंट्रल पार्क इथे झाली.

काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी महाराष्ट्रचे अध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे, गणेश कळमकर, डॉ. प्रल्हाद वडगावकर, मृणाल ढोले-पाटील, मंगेश ससाणे, प्रितेश गवळी, विठ्ठल सातव तसेच धनगर, नाभिक व अन्य विविध ओबीसी समाजाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या विरोधात काहीजणांनी अयोग्य मुद्द्यांवर याचिका दाखल केली आहे. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करण्याची गरज आहे. ओबीसा समाजाच्या न्याय मागण्यांकडे आतापर्यंत कायम दुर्लक्ष झाले आहे. शांतताप्रिय व सनदशीर मार्गावर विश्वास असणारा असा हा समाज आहे. मात्र, अन्याय होत असेल तर शांत राहण्यात अर्थ नाही. सनदशीर मार्गाने या गोष्टींचा प्रतिकार करणे गरजेचे आहे अशी चर्चा बैठकीमध्ये झाली. पुणे शहर, जिल्हा, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांहून ओबीसी समाज या मोर्चाला उपस्थित राहणार आहे. गुरूवारी सकाळी पावणे अकरा वाजता शनिवार वाडा येथून मोर्चा सुरू होईल व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल

Web Title: OBC's Rescue Rescue Morcha today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.