परिचारिका, शिपाई चालवितात रात्रीच्या वेळी रुग्णालय!
By Admin | Updated: November 8, 2014 23:31 IST2014-11-08T23:31:29+5:302014-11-08T23:31:29+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

परिचारिका, शिपाई चालवितात रात्रीच्या वेळी रुग्णालय!
निमगाव केतकी : येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रात्री वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे रुग्णालय रात्री फक्त एक परिचारिका व एकच शिपाई चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबरोबरच, वैद्यकीय अधिका:यांच्या दुर्लक्षामुळे या ग्रामीण रुग्णालयाच्या
परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य
पसरले आहे.
गेल्या 3क्-4क् वर्षापासून
नसबंदी शस्त्रक्रिया, विविध लस निमरूलन, विविध रोगांच्या साथीचे निमरूलन, सर्पदंश औषधोपचार आदींसाठी नावलौकिक येथील ग्रामीण रुग्णालयाने मिळविला आहे. परंतू या रुग्णालयाची जोपासना करण्यामध्ये सध्याचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कमी पडत असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी सेवा
करताना चालढकल करीत असल्याने येथे उपचारांसाठी येणा:या रुग्णांना आवश्यकतेनुसार सेवा मिळत नाही. यामुळे या रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येणा:या नागरिकांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. यामुळे खासगी रुग्णालयाकडे नागरिकांचा कल वाढला आहे.
सद्य:स्थितीत मागील 6 महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी चालढकलीने काम करीत आहेत. काही ठराविक तळमळ असलेले वैद्यकीय अधिकारी काम करीत
आहेत, तर काही रुग्णालयाकडे फिरकतच नाहीत. यामुळे रात्री काम करणा:या परिचारिका व शिपाई यांची अडचण होत आहे.
रात्री एखादा रुग्ण आला, तर औषधोपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागते. सेवा
मिळत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांकडून रुग्णालयाला
कुलूप ठोकण्याचा प्रकार ब:याचदा घडला आहे; परंतु त्याकडे गांभीर्याने कोणीच पाहिले नाही.
(वार्ताहर)
4काही वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कामाचा, तर काही हंगामी कामाचा पगार घेत आहेत. रात्री कोणीच नसते. सर्व भ्रमणध्वनी बहुतेक वेळा बंद असतात; त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या ठिकाणी सर्व कर्मचा:यांना रुग्णांची सेवा करता यावी, यासाठी कर्मचारी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी वास्तव्यास नसतो. त्यामुळे या इमारतीची दुरवस्था झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरळीत सुरु आहे. 3 वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात काम करतात. मात्र,गेल्या काही महिन्यांपासुन 2 अधिकारी रजेवर आहेत. केवळ 1 वैद्यकिय अधिकारी काम पाहत होते.सध्या रजेवर गेलेले 1 वैदयकीय अधिकारी कामावर रुजु झाले आहेत. तसेच दुस:या अधिका:यांनी बदली मागितली आहे. कामावर रुजु होणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. गावातील काही ग्रामस्थ मद्यपान करुन कर्मचा:यांना शिवीगाळ करीत असल्याचा आरोप डॉ.फडणीस यांनी केला आहे. तसेच खोटी तक्रार करुन नाहक त्रस देत आहे.
- अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधिकारी