लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:23+5:302021-03-27T04:10:23+5:30
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांना उपचार देण्यास मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. पालिकेला डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ...

लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णांना उपचार देण्यास मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. पालिकेला डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ कमी पडत आहे. पालिकेकडून सहा महिन्यांसाठी डॉक्टर तसेच नर्सची भरती करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.
याबाबत अगरवाल म्हणाल्या, आजमितीस पालिकेची ५८ लसीकरण केंद्रे असून ५१ केंद्रे खासगी दवाखान्यांमध्ये आहेत. या केंद्रांमध्ये वाढ करण्यासाठी २५ खाटांची क्षमता असलेल्या खासगी रूग्णालयांनाही लसीकरण केंद्रासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
पालिकेच्याही आणखी आठ दवाखान्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी चालविली आहे. त्याकरिता जागेची पाहणी व अन्य आवश्यक सुविधा उभारण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. सोमवारपासून ही केंद्रे सुरू केले जातील, असे अगरवाल यांनी सांगितले.