बारामती तालुक्यात उमेदवारांची कोटींची उड्डाणे
By Admin | Updated: February 18, 2017 02:29 IST2017-02-18T02:29:15+5:302017-02-18T02:29:15+5:30
तालुक्यात यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १६ जण क ोट्यधीश उमेदवार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी

बारामती तालुक्यात उमेदवारांची कोटींची उड्डाणे
बारामती : तालुक्यात यंदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत १६ जण क ोट्यधीश उमेदवार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ९ जण, तर पंचायत समिती गणातील ७ जण कोट्यधीश आहेत.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ५ हजारांपासून, १ लाख तसेच पुढे १३ कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे विवरण निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. जिल्हा परिषदेमधून गुणवडी-शिर्सुफळगटातून निवडणूक लढवित असलेले रोहित पवार यांची सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक १३ कोटी २४ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यात आली आहे.
त्यापाठोपाठ करंजे पुल-निंबूत गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद काकडे यांची ७ कोटी ७० लाख ४९ हजार रुपये संपत्ती आहे. तसेच याच गटातील काँग्रेसचे उमेदवार तानाजी गायकवाड यांची १ कोटी ७९ लाख, सांगवी डोर्लेवाडी गटातील राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी तावरे यांची ५ कोटी ७५ लाख, वडगाव निंबाळकर-मोरगाव
गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार विश्वास देवकाते यांची ३ कोटी ६९ लाख, माळेगाव बु. पणदरे गटातील राष्ट्रवादीच्या रोहिणी तावरे यांची १ कोटी ८९ लाख, सुपे-मेडद गटातील राष्ट्रवादीचे भरत खैरे यांची १ कोटी २८ लाख, तसेच याच गटातील बीजेपीचे उमेदवार दिलीप खैरे यांची ३ कोटी १३ लाख रुपये, तसेच बीजेपीच्या माळेगाव बु. पणदरे गटातील विजया तावरे यांची ३ कोटी ८१ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यात आली आहे. तर गणामध्ये सुपे गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार नीता बारवकर यांची ५ कोटी ७५ लाख रुपये संपत्ती नोंद करण्यत आली आहे. मेडद गणातील याच पक्षाच्या शारदा खराडे यांची ४ कोटी ५ लाख, याच गणातील बीजेपीच्या सुवर्णा भापकर यांची २ कोटी १०लाख, तर शिर्सुफळ गणातून राष्ट्रवादीचे भरत गावडे यांची २ कोटी ७० लाख, मोरगाव गणातील याच पक्षाचे
राहुल भापकर यांची १ कोटी १२ लाख, करंजे पूल गणातून मेनका मगर यांची ४ कोटी ८९ लाख, डोर्लेवाडी गणातील राहुल झारगड यांची १ कोटी ८८ लाख संपत्ती नोंद करण्यात आली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसचे सर्वाधिक उमेदवार कोट्यधीश असल्याचे विवरण पत्रात नोंद केलेल्या संपत्तीवरून दिसून येते. (प्रतिनिधी)