ओतूर परिसरात सोमवारी पुन्हा रुग्ण वाढू लागले .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:46+5:302021-07-27T04:12:46+5:30
प्रत्येक गावात एक- एक असे ९ रुग्ण सापडले. त्यामुळे बाधितांची संख्या २ हजार ७८६ झाली आहे. त्यातील ...

ओतूर परिसरात सोमवारी पुन्हा रुग्ण वाढू लागले .
प्रत्येक गावात एक- एक असे ९ रुग्ण सापडले. त्यामुळे बाधितांची संख्या २ हजार ७८६ झाली आहे. त्यातील २ हजार ६११ बरे झाले आहेत ६४ जण कोव्हीड सेंटर मध्ये तर ३ जण घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
सोमवारी हिवरेखुर्द गावात ३, नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ९० झाली आहे. त्यातील ८० बरे झाले आहेत ५जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या १ हजार २०३ झाली आहे. त्यातील १ हजार १५० बरे झाले आहेत. ४१ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२ जण उपचार घेत आहेत. धोलवड येथील येथील बाधितांची संख्या १४७ झाली आहे. त्यातील १३९ बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. खामुंडी येथील १४७ पैकी १२० बरे झाले आहेत २० जण उपचार घेत आहेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. उदापूर येथील २४७ पैकी २२५ बरे झाले आहेत ११ ,जण उपचार घेत आहेत ११ जणाचा मृत्यू झाला आहे
पाचघर येथील ६५ पैकी ५९ बरे झाले आहेत एक जण उपचार घेत आहे ५ जणांच्या मृत्यू झाला आहे अशी माहिती डॉ साऱोक्ते व डॉ यादव शेखरे यांनी दिली