शनिवारी रुग्णसंख्या आली पाच हजारांच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST2021-04-11T04:11:11+5:302021-04-11T04:11:11+5:30

पॉझिटिव्हिटी दर (आजचा) : १९.५ टक्के पॉझिटिव्हिटी दर (आजवरचा) : १८ ४९५३ रुग्णांची वाढ : ४३८९ रुग्ण झाले ...

The number of patients on Saturday was below five thousand | शनिवारी रुग्णसंख्या आली पाच हजारांच्या खाली

शनिवारी रुग्णसंख्या आली पाच हजारांच्या खाली

पॉझिटिव्हिटी दर (आजचा) : १९.५ टक्के

पॉझिटिव्हिटी दर (आजवरचा) : १८

४९५३ रुग्णांची वाढ : ४३८९ रुग्ण झाले बरे तर ४६ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग वाढ सुरुच असली तरी शनिवारी मात्र हा आकडा पाच हजारांच्या खाली गेला. शनिवारी दिवसभरात ४ हजार ९५३ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात ४ हजार ३८९ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १०१४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५० हजार ४७३ झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०१४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ४ हजार ७४६ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ४६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ७०० झाली आहे. पुण्याबाहेरील १५ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिवसभरात एकूण ४ हजार ३८९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार ८०९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ३ लाख २२ हजार ९८२ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५० हजार ४७३ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २५ हजार ५०४ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १६ लाख ९६ हजार ९४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

Web Title: The number of patients on Saturday was below five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.