शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाबाबत गैरसमजुतींचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:22 IST

भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही.

पुणे - भारतात अवयवदानाविषयी मोठे गैरसमज दिसून येतात. मुळातच आपले त्या विषयाबाबतचे अज्ञान, त्यातून मनात तयार झालेली भीती यामुळे नवीन बदल स्वीकारण्याची तयारी होत नाही. अद्यापही देशातील पाच राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश असे आहेत, की ज्यात अवयवदानविषयक जनजागृती नाही. दरवेळी शासनाला दोष देण्यापेक्षा आपण स्वत:हून आवश्यक ते बदल आत्मसात करण्याविषयी जागरुकता दाखविली पाहिजे.

खासकरून दक्षिणेकडील राज्यांमध्ये अवयवदानविषयक मोठ्या प्रमाणात सजगता पाहावयास मिळते. देशातील एकूण अवयवदानाच्या आकडेवारीचा वेध घेतल्यास त्यातून प्रचंड प्रमाणात विरोधाभास असल्याचे दिसते. ‘प्रचार अवयवदानाचा’ या माध्यमातून लोकमानस घडवून त्याचे परिवर्तन अवयवदानात कसे करता येईल, याचा विचार करण्याचे काम फाउंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत. पुण्यात मागील तीन वर्षांपासून २०० जणांकडून अवयवदान झाले. या आकडेवारीवरून नजर फिरवल्यास आपल्याला अवयवदान व जनजागृती याची कल्पना येईल. मंगळूर येथे नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन, मंगळूर आणि असोसिएशन आॅफ मेडिकल कन्सल्टंट यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाकरिता एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले. त्यात अनुक्रमे ७५, ५३ आणि १०५ किमी अंतर सायकलिंग करण्यात आली.या सर्वांमागील उद्देश हाच, की अवयवदानचा प्रचार आणि प्रसार. अवयवदानाविषयी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अभ्यास केला असता त्यात रत्नागिरी, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये एकही परवानाधारक अवयवदानाचे रुग्णालय नाही. हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. त्यामुळे भविष्यात राष्ट्रबांधणीच्या मोठ्या गप्पा आपण करीत असलो तरीदेखील प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणे मोठी अवघड गोष्ट आहे. याकरिता गरज आहे ती जनमानसाचे वैचारिक प्रबोधन करण्याची. याबरोबरच शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयातही अवयवदानाचा परवाना नाही. या तुलनेत नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अवयवदानाची जागृती झालेली दिसते. आता सोलापूर, कोल्हापूरमध्ये अवयवदान होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध असताना दुसºया बाजूला अद्यापही अवयवदानाविषयी फारशी माहिती नसल्याचे चित्र दिसून येते. या वास्तवाचा स्वीकार करून आगामी काळात भरीव कामगिरी कशी करता येईल, याचा विचार सर्वांना करावा लागेल. यासाठी केवळ अवयवदानाशी संबंधित संस्था किंवा संघटनांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. २०१६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या संस्थेला महाराष्ट्र आरोग्य विभागाने आपला हेल्पलाईन क्रमांक दिला. त्या माध्यमातून संस्थेचा उत्साह वाढून अवयवदानाविषयी काम करण्याचे मनोबल वाढण्यास मदत झाली. सोशल माध्यमांचा उपयोग याकामी करता येऊ लागला. यूट्यूबवर अवयवदानाविषयीची माहिती अपलोड करून सबंध जगभरात पोहोचता येत आहे. अवयवदान ही चळवळ व्हावी याकरिता सर्व पातळीवर प्रयत्न झाल्यास त्याचा उपयोग सर्वांनाच होईल. अवयवदानाबाबत जगातील इतर प्रगत देशांची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला आणखीमोठी मजल मारायची आहे, याची कल्पना येईल.तीन वर्षांपूर्वी अवयवदानाविषयी पाच मिनिटांचा माहितीपट तयार केला होता. त्या निर्मितीप्रक्रियेदरम्यान आपल्याकडे अद्यापही अवयवदानाविषयी मोठ्या प्रमाणावर कामाची गरज असल्याचे निदर्शनास आले. रिबर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आता अवयवदान करण्यासाठी प्रचार-प्रसाराकडे लक्ष केंद्रित करण्यात आले असून नुकतीच त्याची सुरुवात कर्नाटकातील मंगळूर येथून करण्यात आली. सायकल रॅलीतून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याचे काम यानिमित्ताने करण्यात आले. याविषयी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांच्याशी साधलेला संवाद.राजेश शेट्टी : देशातील पाच राज्ये आणि कें द्रशासित प्रदेशांत अवयवदान नाही

टॅग्स :PuneपुणेOrgan donationअवयव दान